विराट कोहलीकडून मोदींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा ६९वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Updated: Sep 17, 2019, 12:06 PM IST
विराट कोहलीकडून मोदींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा title=

मोहाली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा ६९वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच मोदींवर सत्ताधारी, विरोधक तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

'आमच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमचं आरोग्य चांगलं राहावं आणि तुम्ही देशाला नव्या उंचीवर घेऊन जाल, हीच देवाकडे प्रार्थना करतो,' असं ट्विट विराट कोहलीने केलं आहे.

विराट कोहली हा सध्या टीम इंडियासोबत मोहालीमध्ये आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली पहिली टी-२० पावसामुळे रद्द झाली होती. टीम इंडिया भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकही मॅच जिंकली नाही. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या सामन्यात हे रेकॉर्ड पुसून टाकण्याचा प्रयत्न विराट आणि त्याची टीम करेल.

मोहालीमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत २ टी-२० मॅच खेळल्या आहेत. यातल्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. भारताने या मैदानात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे.

दक्षिण आफ्रिका याआधी भारतात २०१५ साली ३ टी-२० मॅचची सीरिज खेळली होती. यामध्ये टीम इंडियाचा ०-२ने पराभव झाला होता. त्या सीरिजमधलीही एक मॅच पावसामुळे रद्द झाली होती.