'विराट' विक्रम, कोहलीने सर्व सेलिब्रिटींना टाकलं मागे

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. 

Updated: Feb 18, 2020, 11:27 AM IST
'विराट' विक्रम, कोहलीने सर्व सेलिब्रिटींना टाकलं मागे title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. इन्स्टाग्रामवर कोहलीनं 50 कोटी फॉलोअर्सचा टप्पा केला आहे. इन्स्टाग्रामवर 50 कोटी फॉलोअर्सचा टप्पा करणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. कोहलीनं आतापर्यंत इन्स्टावर 930 पोस्ट केल्या आहेत. एकंदर भारतीय सेलिब्रिटींच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सवर नजर टाकली तर प्रियंका चोप्रा दुसऱ्या तर दीपिका पदुकोण तिसऱ्या स्थानी आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या माध्यमातून अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केला आहे. पण क्रिकेटच्या मैदानावरच नाही तर आता सोशल मीडियावर ही विराटने नवा रेकॉर्ड केला आहे. विराट कोहली पहिला भारतीय सेलिब्रिटी बनला आहे. ज्याचे इन्स्टाग्रामवर 50 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. विराट कोहलीनंतर अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिचे इन्स्टाग्रामवर 49.8 मिलियन फॉलोअर आहेत.

इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत टॉप-10 भारतीय सेलिब्रिटींपैकी विराट हा एकटा क्रिकेटर आहे. महेंद्र सिंह धोनीचे इन्स्टाग्रामवर 20.1 मिलियन फॉलोअर आहेत.

विराट कोहलीची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचे इन्स्टाग्रामवर 32.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. विराट कोहली सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. टीम मधले खेळाडू आणि अनुष्का सोबतचे अनेक फोटो तो नेहमी शेअर करत असतो.