विराट संसाराला लागला! हा फोटो होतोय ट्रोल

भारतीय क्रिकेट टीम नव्या वर्षाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचनं करेल.

Updated: Dec 31, 2017, 11:51 PM IST
विराट संसाराला लागला! हा फोटो होतोय ट्रोल title=

केप टाऊन : भारतीय क्रिकेट टीम नव्या वर्षाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचनं करेल. ५ जानेवारीपासून पहिल्या टेस्टला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय टीम केप टाऊनला पोहोचली आहे. नुकतंच लग्न झालेला भारतीय टीमचा कॅप्टन विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत दक्षिण आफ्रिकेला गेला आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये पोहोचलेल्या भारतीय टीम आणि त्यांच्या परिवारासोबतचे फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. यातला विराट आणि अनुष्काचा एक फोटो ट्रोल होतोय.

या फोटोमध्ये विराट- अनुष्का शॉपिंगच्या रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. तर या दोघांच्या मागे शिखर धवनची पत्नी आयशा मुखर्जी आणि त्यांची मुलगीही दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये विराट-अनुष्का ५० टक्के डिस्काऊंट असलेल्या शॉपसमोर रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करून यूजर्स मजेदार कमेंट करत आहेत.

११ डिसेंबरला विराट आणि अनुष्काचं इटलीमध्ये लग्न झालं. यानंतर हे दोघं फिनलँडला हनीमूनला गेले होते. हनीमूननंतर दिल्ली आणि मुंबईमध्ये दोघांचं रिसेप्शन पार पडलं. मुंबईतल्या रिसेप्शननंतर हे दोघं दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले. 

 

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा जवळपास २ महिने चालणार आहे. या दौऱ्यामध्ये भारत ३ टेस्ट, ६ वनडे आणि ३ टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे.