ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाची 'पुल' टू धमाल; अचानक व्हायरल झाला 'तो' Video

Indias amazing victory over Pakistan : बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा ढाण्या वाघ विराट कोहली अन् रविंद्र जडेजा एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Updated: Sep 12, 2023, 11:34 AM IST
ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाची 'पुल' टू धमाल; अचानक व्हायरल झाला 'तो' Video  title=
Team India Swiming Pool Video

Team India Swiming Pool Video : विराट कोहलीने (Virat kohli) पुन्हा एकदा पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळवलं. पाकिस्तानविरुद्ध नाबाद 122 धावांची खेळी साकारत विक्रमांचा पाऊस पाण्याचं काम कोहलीने केलंय. त्यामुळे खऱ्या अर्थाने तो भारतीयांसाठी किंग ठरलाय. ऐतिहासिक विजयानंतर रोहित अँड कंपनीचं हॉटेलमध्ये जोरदार स्वागत केलं गेलं. त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा  केला. सामन्यानंतर खेळाडू थेट स्विमिंग पूलमध्ये (swiming pool) उतरले. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा ढाण्या वाघ विराट कोहली अन् रविंद्र जडेजा एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तर रोहित शर्मा देखील त्यांना चांगली साथ देतोय. रोहितने देखील पाण्यात गाण्याचा आनंद लुटला. तर यंगस्टर कुठं मागे राहणार होते. शुभमन गिलने देखील पाण्यात सुर मारला अन् स्विमिंगपूलमध्ये मस्ती केली. खुद बीसीसीआयने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पाहा Video

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतक ठोकत टीम इंडियाचा पाया रचला. त्यानंतर विराट कोहली आणि के. एल. राहुल यांच्या शतकांच्या जोरावर भारताने पाकिस्तानला 357 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य दिलं होतं. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव 128 धावांवर आटोपला. कुलदीप यादवने पाचचा पंच लगावला. विराट कोहलीला  सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

आणखी वाचा - याला म्हणतात दहशत! वसिम अक्रम म्हणतो, 'मला स्वप्नातही कोहलीच दिसतो'

दरम्यान, आम्ही सलग तीन दिवस खेळतोय. आम्ही सर्व कसोटी क्रिकेटपटू आहोत. मी 100 हून अधिक कसोटी सामने खेळलोय, त्यामुळे आम्हाला आत्ताच तयारी करावी लागते. आम्हाला माहितीये की दुसऱ्या दिवशी कसं खेळायचं. मी नोव्हेंबर महिन्यात 35 वर्षांचा होईल, त्यामुळे आता फिटनेसवर सतत काम करतोय. इथलं वातावरण खूपच दमट आहे, पावसाची संततधार सुरूच आहे, त्यामुळं ग्राऊंड्स स्टाफचे आभार मानावे तेवढे कमी आहेत, असं विराट म्हणाला आहे.