होर्मोनल अ‍ॅक्नेपासून सुटका हवीये? मग, आहारात करा 'हे' बदल

वाढत्या वयात होत असलेल्या बदलांमुळे चेहऱ्यावरील पुरळची समस्या ही चिंतेची बाब ठरते. आहारात काही बदल केल्याने तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. 

Updated: Jan 30, 2025, 02:02 PM IST
होर्मोनल अ‍ॅक्नेपासून सुटका हवीये? मग, आहारात करा 'हे' बदल title=

Hormonal Acne: फक्त महिलाच नाही तर पुरुषसुद्धा आकर्षक दिसण्याचा प्रयत्नात बऱ्याच उपायांचा अवलंब करतात. खास करुन चेहऱ्याच्या आकर्षकतेकडे ते अधिक लक्ष देतात. अशातच, चेहऱ्यावरील सतत येणारे पुरळ ही तरुणांसाठी चिंतेची बाब असते. तोंडावर पुरळ येणे ही सामान्य बाब जरी असली तरी त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. चेहऱ्यावर पुरळ येण्याची बरीच कारणे असतात. होर्मोन्स मध्ये होत असलेल्या बदलांमुळे किंवा कालांतराने वयानुसार होत असलेल्या बदलांमुळे ही समस्या उद्भवत असते. कित्येक लोक या समस्येमुळे त्रस्त असतात. होर्मोनल बदलांमुळे शरीरातील सीबमचे वाढते प्रमाण हे चेहऱ्यावरील पुरळचे मुख्य कारण असते. 

या होर्मोनल अ‍ॅक्नेपासून सुटका मिळवण्यासाठी लोक बरेच उपाय करतात. महाग प्रोडक्ट्स तसेच डॉक्टरांनी सुचवलेले प्रोडक्ट्सचा सुद्धा वापर करतात. कधीकधी बऱ्याच उपायांचा अवलंब केल्यानंतर सुद्धा या समस्येपासून सुटका मिळू शकत नाही. यामुळे लोक त्रस्त होत असतात. परंतु, महागड्या प्रोडक्ट्सच्या वापराऐवजी रोजच्या आहारात थोडा बदल केल्याने आपण चेहऱ्यावरील पुरळीची समस्या दूर करु शकतो. बसला ना धक्का? जर तुम्हाला खरंच या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर आरोग्यातज्ज्ञांनी सुचवलेल्या या पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा. 

1. ओमेगा-3 युक्त पदार्थ

चेहऱ्यावरील होर्मोनल अ‍ॅक्ने दूर करण्यासाठी ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स हे गॅम चेंजर ठरु शकतात. ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स शरीरातील कोणत्याही भागांवर असलेली सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्वचारोगतज्ज्ञ, आपल्या आहारात ओमेगा-3 युक्त पदार्थ जसे की बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बीया आणि सूर्यफुलाच्या बीया यांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. हे पदार्थ शरीरातील सीबमचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी सुद्धा फायद्याचे ठरतात. 

2. झिंकचे भरपूर प्रमाण असलेले पदार्थ

ज्या पदार्थांमध्ये झिंकचे भरपूर प्रमाण असते, असे पदार्थ चेहऱ्यावरील पुरळ कमी करण्यासाठी मदतशीर ठरतात. तज्ज्ञांच्या मते, झिंकमध्ये अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात आणि हे सीबम नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. जर शरीरात सीबमचे प्रमाण कमी असेल तर चेहऱ्यावरील पुरळसुद्धा कमी होतील. त्यामुळे मांसाहारी पदार्थ तसेच मासे आणि सीड्सचा आहारात समावेश करणे फायद्याचे ठरेल. 

3. इनोसिटॉलयुक्त पदार्थ

इनोसिटॉल म्हणजेच शूगरचा प्रकार. इनोसिटॉल आपल्या शरीरात आणि आपण सेवन करत असलेल्या पदार्थांमध्येसुद्धा आढळतो. हा घटक पेशींच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. इनोसिटॉलयुक्त पदार्थ खाल्याने शरीरातील होर्मोन्सना नियंत्रित करता येऊ शकते. चेहऱ्यावरील टरबुज सारखे आंबट पदार्थ तसेच डाळी यांचे योग्य प्रमाणात सेवन करणे फायद्याचे ठरेल. 

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)