शास्त्री-कोहलीच्या काळात सातत्याने संघाबाहेर, रोहित कॅप्टन होताच संधी, कोण आहे तो प्लेअर?

सहाजिकच आहे की कर्णधार बदलल्यामुळे खेळात आणि टीममध्ये अनेक बदल होणार.

Updated: Feb 20, 2022, 10:21 PM IST
शास्त्री-कोहलीच्या काळात सातत्याने संघाबाहेर, रोहित कॅप्टन होताच संधी, कोण आहे तो प्लेअर?  title=

मुंबई : रोहित शर्माला नुकतेच तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. विराट कोहोलीनंतर आता अनेक वर्षांनी टीम इंडियाचं कर्णधारपद रोहितला मिळालं आहे. सहाजिकच आहे की कर्णधार बदलल्यामुळे खेळात आणि टीममध्ये अनेक बदल होणार. तसेच यामुळे खेळाची पद्धत देखील बदलणार. तसेच काहीसे रोहित शर्माच्या येण्याने झाले.  यामुळे अशा एका खेळाडूला संधी मिळाली आहे, जो यापूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीमसाठी फारसा खेळू शकलेला नाही.

हा खेळाडू दुसरा कोणी नसून संघाचा जादुई फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आहे. कुलदीप यादवचे खूप मोठ्या कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. बराच काळ टीम इंडियातून बाहेर असलेला कुलदीप आता पुन्हा एकदा तिन्ही फॉरमॅटमध्ये परतला आहे.

2017 ते 2019 या काळात कुलदीपला संघाची ताकद मानली जात होती, पण त्यानंतर चांगला रेकॉर्ड असूनही या गोलंदाजाकडे दुर्लक्ष केले जात होते आणि त्याला संघात खेळण्याची फारच कमी संधी मिळाली.

श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेसाठी कुलदीप यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे. कुलदीपने 13 फेब्रुवारी 2021 रोजी भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला.

कुलदीपने आतापर्यंत 7 कसोटी सामन्यात 23 च्या सरासरीने 26 बळी घेतले आहेत. पण आता त्याचे संघात पुनरागमन झाले आहे आणि हा खेळाडू पुन्हा प्लेइंग 11 मध्ये परतला आहे, ज्याचा फायदा टीम इंडियाला देखील होईल हे नक्की.

कुलदीप यादवच्या युनिक गोलंदाजीने इंडियन टीमला अनेक सामने जिंकून दिले आहेत. कुलदीप यादवने 22 टी-20 सामन्यात 41 विकेट घेतल्या आहेत. त्याने 45 आयपीएल सामने देखील खेळले आहेत ज्यात त्याने 40 विकेट घेतल्या आहेत.

कुलदीपची वनडे कारकीर्दही चमकदार राहिली आहे. त्याने 65 एकदिवसीय सामन्यांमध्ये 107 विकेट घेतल्या आहेत. त्याचे हे आकडे त्याच्या प्रतिभेबद्दल सांगण्यासाठी पुरेसे आहेत.

2019 च्या वर्ल्डकपनंतर निवड समितीने कुलदीप यादवकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. 2021 च्या टी 20 वर्ल्डकपमध्येही त्याला त्याच्या स्थान मिळाले नाही. कुलदीपला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

निवडकर्त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतही त्याचा समावेश केलेला नाही. अशा स्थितीत त्याच्या कारकिर्दीवर टांगती तलवार दिसली. मात्र कर्णधार रोहितने त्याला पुन्हा एकदा आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी दिली आहे. कुलदीप देखील रोहितचा विश्वास खरा ठरवेल अशी अपेक्षा