IND vs WI, 3RD T20I | मुंबईकर 'सूर्या' तळपला, विडिंजला विजयासाठी 185 धावांचे आव्हान

 टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली.   

Updated: Feb 20, 2022, 09:11 PM IST
IND vs WI, 3RD T20I | मुंबईकर 'सूर्या' तळपला, विडिंजला विजयासाठी 185 धावांचे आव्हान title=
छाया सौजन्य : बीसीसीआय

कोलकाता : सूर्यकुमार यादवच्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजला विजयासाठी 185 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये  5 विकेट्स गमावून 184 धावा केल्या. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने तुफानू खेळी केली. सूर्यकुमार यादवने 31 चेंडूत 7 सिक्स आणि 1 फोर ठोकत सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने नाबाद 35 धावांची खेळी करत सूर्याला अखेरपर्यंत साथ दिली. (ind vs wi 3rd t20i team india set 185 runs target for west indies at eden garden kolkata)    

तसेच ईशान किशनने 34 आणि श्रेयस अय्यरने 25 रन्स केल्या. तर विंडिंजकडून फॅबिएन अॅलेनचा अपवाद वगळता प्रत्येक गोलंदाजाने प्रत्येकी 1 विकेट घेतला. टीम इंडिया या मालिकेत 2-0  ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया हा तिसरा सामना जिंकून विंडिजला क्लिन स्वीप देणार की विंडिज शेवट गोड करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. 

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन :  ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, रवी बिश्नोई आणि आवेश खान. 

वेस्टइंडिज प्लेइंग इलेव्हन :  कायल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल, किरॉन पोलार्ड (कॅप्टन), जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, डॉमिनिक ड्रेक्स, फॅबियन ऍलन आणि हेडन वॉल्श.