दिल्लीतील रिसेप्शनआधी विरुष्का येथे जाणार हनीमूनला

इटलीच्या टस्कनीमध्ये ११ डिसेंबरला विराट आणि अनुष्का विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर विराट आणि अनुष्का हनीमूनला कुठे जाणार हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आहे. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 13, 2017, 01:04 PM IST
दिल्लीतील रिसेप्शनआधी विरुष्का येथे जाणार हनीमूनला title=

मुंबई : इटलीच्या टस्कनीमध्ये ११ डिसेंबरला विराट आणि अनुष्का विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर विराट आणि अनुष्का हनीमूनला कुठे जाणार हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आहे. 

बॉलीवूड लाईफच्या बातमीनुसार, विराट आणि अनुष्का हे मंगळवारीच बोर्गो फिनोशिएटोला रवाना झाले. दिल्लीला परत येण्याआधी ते एकमेकांसोबत वेळ घालवणार आहेत. 

दिल्ली, मुंबईत रिसेप्शन

भारतात परतल्यानंतर २१ डिसेंबरला दिल्लीमध्ये त्यानंतर २६ डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन पार्टी असणार आहे. यानंतर हे दोघेही दक्षिण आफ्रिकेला जाणार आहेत. 

दोघेही नव्या वर्षाचे सेलिब्रेशन दक्षिण आफ्रिकेत करणार आहेत. यानंतर विराट कर्णधार म्हणून सीरिज खेळणार आहे तर अनुष्का कामासाठी भारतात परतणार आहे.