मुंबई : विराट आणि अनुष्का हे आता विवाहबंधणात अडकले आहेत. इटलीमध्ये त्यांनी एका अलिशान रिसॉर्टमध्ये लग्न केलं.
विराट आणि अनुष्काच्या विवाहाचा खर्च कोटींमध्ये गेला आहे. पण दोघांचा विवाह होताच त्यांची ब्रँड व्हॅल्यू देखील वाढली आहे. मिस्टर अँड मिसेज कोहली हे दोघे आता एक ब्रँड झाले आहेत. विरुष्का नावाचा ब्रँड आता मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे. शॅम्पूपासून कोल्ड ड्रिंकच्या कमर्शियलपर्यंत विराट आणि अनुष्काने एकत्र अॅड केली आहे.
विराट आणि अनुष्का यांनी काही दिवसांपूर्वीच एका कपड्याच्या ब्रँडसाठी अॅड शूट केली. लग्नाच्या आधी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली प्रत्येक अॅडमागे जवळपास ५ ते ६ कोटी रुपये घेत होते. पण विराटने अनुष्का सोबत इटलीमध्ये सात फेरे घेतल्यानंतर एंडोर्समेन्ट वर्ल्डमध्ये विरुष्का नावाचा ब्रँड सातव्या आसमानावर आहे.
११ डिसेंबरला विराट आणि अनुष्का यांचा विवाह पार पडल्यानंतर त्यांची ब्रँड वॅल्यूही वाढत चालली आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या या नव्या जोडीला साईन करण्यासाठी उत्सूक आहेत. या नव्या कपलची मागणी आता चांगलीच वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे विराट आणि अनुष्काची एका अॅडसाठीचा चार्ज हा ९ ते १० कोटी झाला आहे. याचा अर्थ इटलीमध्ये झालेला लग्नाचा खर्च एका झटक्यात वसूल होणार आहे. मिस्टर अँड मिसेज कोहली यांनी आता त्यांचा नवा ब्रँड तयार केला आहे. विरुष्का नावाचा हा ब्रँड आपल्यासोबत जोडण्यासाठी अनेक जण उत्सूक आहेत.