भारत विरुद्ध श्रीलंका दुसरी वन-डे मोहालीत रंगणार

भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यान दुसरी वनडे रंगणार आहे. दरम्यान, धरमशाला वन-डेमध्ये टीम इंडियाची बॅटिंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्यामुळे आजच्या वन-डेकडे लक्ष लागलेय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 13, 2017, 08:58 AM IST
भारत विरुद्ध श्रीलंका दुसरी वन-डे मोहालीत रंगणार  title=

मोहाली : भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यान दुसरी वनडे रंगणार आहे. दरम्यान, धरमशाला वन-डेमध्ये टीम इंडियाची बॅटिंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्यामुळे आजच्या वन-डेकडे लक्ष लागलेय. त्यामुळे टीम इंडियासमोर मॅच जिंकत सीरिजमध्ये कमबॅकचं आव्हान असणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वगुणांची कसोटी लागणार आहे.

शंभरी गाठताना दमछाक

धरमशाला वन-डेत भारतीय टीमचे रथी-महारथी श्रीलंका बॉलर्ससमोर अपयशी ठरलेत. महेंद्रसिंग धोनीचा अपवाद वगळता एकाही बॅट्समनला श्रीलंकेच्या बॉलर्ससमोर तग धरता आली नाही. धोनीनं हाफ सेंच्युरी झळकावली नसती तर टीम इंडियाला साधी शंभरीही गाठता आली नसती. 

पराभवाचं खापर बॅट्समनवर

धरमशालमध्ये श्रीलंकेच्या लकमलनं टीम इंडियाचं कंबरडच मोडून काढलं होतं. आता लकमल नावाचं कोड भारतीय टीमला उलगडात येणार का हाच खर प्रश्न आहे. कॅप्टन रोहितनंही धर्मशालेतील पराभवाचं खापर बॅट्समनवरच फोडलं होतं. 

शर्माच्या नेतृत्व गुणांची कसोटी

टीम इंडियाच्या बॅट्समनना मोहालीत आपली बॅटिंग कमालीची उंचवावी लागणार आहे. या मॅचमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्व गुणांची कसोटी लागणार आहे. आता टीम इंडिया सीरिजमध्ये कमबॅक करणार का याकडं नजरा लागल्यात.