'त्याला हवं ते करेल'; धोनीच्या हुक्का ओढतानाच्या व्हिडीओवरुन नेटकरी भिडले

MS Dhoni’s Viral Video : महेंद्रसिंह धोनीचे फोटो आणि व्हिडिओ वेळोवेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो स्मोकिंग करताना दिसत आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 7, 2024, 09:32 AM IST
'त्याला हवं ते करेल'; धोनीच्या हुक्का ओढतानाच्या व्हिडीओवरुन नेटकरी भिडले title=

MS Dhoni With Hookah : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या चमकदार खेळीसाठी आणि मैदानाबाहेर साधे जीवन जगण्यासाठी ओळखला जातो. महेंद्रसिंह धोनीने त्याच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो आपल्या पाळीव प्राण्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करताना दिसत होता. त्याच्या या व्हिडीओला पाहून सर्वांनी माहीचे कौतुक केले होते. पण आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार 'हुक्का' ओढताना दिसत आहे.

महेंद्रसिंह धोनी हा एकमेव कर्णधार आहे ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली तीन वेळा आयसीसीचे विजेतेपद पटकावले आहे. यंदा तो इंडियन प्रीमियर लीगच्या 2024 मध्ये शेवटची खेळी खेळणार आहे. धोनीचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रचंड चाहते आहेत. माही सोशल मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर राहत असला तरी, कधी कधी तिचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला तर तो वेगात पसरतो. धोनीशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की या व्हिडिओमध्ये तो हुक्का पीत आहे.

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो हुक्का ओढताना दिसत आहे. या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. याबद्दल चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, काहीजण त्यावर टीका करत आहेत तर काही धोनीचा बचाव करताना दिसत आहेत. माही गेल्या काही दिवसांपासून दुबईमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. 

व्हिडीओमध्ये, धोनी त्याच्या लांब केसांचा लूक असलेल्या सूटमध्ये दिसत आहे आणि त्याच्या आजूबाजूला काही लोकही दिसत आहेत. त्याचवेळी धोनी हुक्का ओढताना दिसला. धोनीने आधी हुक्का तोंडात घातला आणि धूर आत घेतला आणि नंतर तो धूर बाहेर काढताना दिसला. धोनीच्या या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या व्हिडीओमध्ये अनेकांनी महेंद्रसिंह धोनीला ट्रोल केले आहे.

एका यूजरने, 'माहीची इच्छा' असे म्हटलं आहे. तर दुसर्‍या एका युजरने, 'माही भाई आधीच आयपीएल जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पार्टी करत आहे,' असे म्हटलं आहे. 

दरम्यान, माजी ऑस्ट्रेलियन टी20 कर्णधार जॉर्ज बेलीने एकदा खुलासा केला होता की एमएस धोनी तरुणांसोबत चांगले संबंध निर्माण करण्यासाठी हुक्का सेशन करत असे. बेली हा 2009 ते 2012 दरम्यान चेन्नईच्या संघाचा भाग होता आणि 2016 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचाही भाग होता.