IND vs AFG टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा, 'या' खेळाडूच्या खांद्यावर सोपवली कॅप्टन्सी!

IND vs AFG T20I : अफगाणिस्तानने भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा (Afghanistan T20 Squad against India) केली आहे. इब्राहिम झद्रान (Ibrahim Zadran) या खेळाडूच्या खांद्यावर आता कॅप्टन्सीची जबाबदारी असणार आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jan 6, 2024, 06:39 PM IST
IND vs AFG टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा, 'या' खेळाडूच्या खांद्यावर सोपवली कॅप्टन्सी! title=
Afghanistan T20 Squad against India

Afghanistan T20 Squad against India : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता टीम इंडिया जोरदार तयारीला लागली आहे. येत्या 11 जानेवारीपासून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेसाठी कोणाला संधी मिळणार? असा सवाल विचारला जात असतानाच आता अफगाणिस्तानने भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा (Afghanistan T20 Squad against India) केली आहे. इब्राहिम झद्रान (Ibrahim Zadran) या खेळाडूच्या खांद्यावर आता कॅप्टन्सीची जबाबदारी असणार आहे. तर राशिद खानच्या रुपात अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

यंदाच्या वर्षी खेळल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचा विचार करता ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना आता वर्ल्ड कपपूर्वी 5 टी-ट्वेंटी सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. अशातच आता अफगाणिस्तानचा संघासाठी देखील लिटमस टेस्ट असणार आहे. रशीद खानचा भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलाय. मात्र, तो खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. पाठीच्या शस्त्रक्रियेतून नुकताच बरा झाल्याने तो संघात खेळणार नाही.

मुजीब उर रहमानचं जोरदार कमबॅक

इब्राहिम झद्रान भारताविरुद्धच्या मालिकेत अफगाणिस्तानचे नेतृत्व करणार आहे. तर मुजीब उर रहमानचं पुन्हा एकदा संघात पुनरागमन झालं आहे. अलीकडेच युएई विरुद्ध झालेल्या T20 सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली नव्हती. आता त्याला पुन्हा संधी दिल्याने वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे.

भारत दौऱ्यासाठी अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ - इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झादरान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद. नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशिद खान.

भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला T20- ११ जानेवारी- मोहाली
दुसरा T20- १४ जानेवारी- इंदूर
तिसरा T20- १७ जानेवारी- बंगळुरू