MS Dhoni: चेन्नईच्या 'थाला'चा No Ball वर गेम, वैभवने केला फॅन्सचा इगो हर्ट; पाहा Video

Vaibhav Arora Bold MS Dhoni: वैभव अरोरा या गोलंदाजं नाव तुम्ही आधीही क्वचित ऐकलं असेल. कोणाच्याही नरजेत न बसणारा गोलंदाज. मात्र आज प्रकाशझोतात आलाय तो धोनीला केलेल्या बोल्डमुळे.

सौरभ तळेकर | Updated: May 14, 2023, 10:14 PM IST
MS Dhoni: चेन्नईच्या 'थाला'चा No Ball वर गेम, वैभवने केला फॅन्सचा इगो हर्ट; पाहा Video title=
Vaibhav Arora Bold MS Dhoni

MS Dhoni, CSK vs KKR: कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) खेळल्या जात असलेल्या सामन्यात सीएसकेने केकेआरसमोर 145 धावांचं आव्हान ठेवलंय. सुरूवातीपासून कोलकाताच्या गोलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व निर्माण केलं होतं. चेन्नईचे शेर पत्त्यासारखे कोसळले. ऋतुराज, कॅन्वे आणि रहाणेला मोठी खेळी खेळता आली नाही. त्यानंतर रायडू आणि मोईन अली देखील झटपट बाद झाले, त्यामुळे आता थाला धोनी लवकर मैदानात उतरेल, अशी शक्यता होती. मात्र, धोनी (MS Dhoni) काय लवकर खेळायला आला नाही.

चेपॉक म्हणजे धोनीचं आवडतं मैदान. चेपॉकवर धोनी खेळायला आलाच पाहिजे, असं एक समीकरण असतं. मात्र, त्याला बगल देत धोनीने शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा यांना लवकर मैदानात धाडलं. पण चेपॉकने धोनीची साथ काही सोडली नाही. इनिंग संपण्यासाठी 2 बॉल शिल्लक असताना धोनी मैदानावर आला. दुसरा पर्यायच नव्हता. जडेजा बाद झाल्यावर धोनीला मैदानात यावच लागलं. धोनी आला म्हटल्यावर सर्वांना अपेक्षा होत्या, दोन खणखणीत षटकारांची, पण प्रेक्षकांच्या पदरी निराशा पडली. त्याला कारण होता नवा कोरा कोलकाताचा गोलंदाज वैभव अरोरा...

वैभव अरोरा (Vaibhav Arora) या गोलंदाजं नाव तुम्ही आधीही क्वचित ऐकलं असेल. कोणाच्याही नरजेत न बसणारा गोलंदाज. मात्र आज प्रकाशझोतात आलाय तो धोनीला केलेल्या बोल्डमुळे. धोनी मैदानावर आला तेव्हा फक्त 2 बॉल बाकी होत्या. 19 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर वैभवने वाईड बॉल टाकला. धोनीने तो सोडून देणं पसंत केलं. त्यानंतर पुढचा बॉल वैभवने परफेक्ट टाकला, तो बॉल धोनीला खेळता आला नाही. मात्र हा बॉल ठरला नो बॉल. अंपायरने नो बॉल सांगितल्यावर आता सिक्स शिवाय पर्याय नाही, असं सर्वांना वाटलं होतं. मात्र, फ्री हिटवर एक परफेक्ट यॉर्कर वैभवने टाकला आणि धोनीला क्लिन बोल्ड केलं. फ्री हिट असल्याने धोनी आऊट झाला नाही. वैभवचा बॉल एवढा परफेक्ट होता की, धोनीला देखील नेमकं काय झालं कळालं नाही. 

पाहा Video

दरम्यान, वैभव अरोराचा खतरनाक यॉर्कर पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. महान अशा धोनीला बोल्ड करणं कोणा येड्या गबाळ्याचं काम नाही. मात्र, वैभवच्या या एका बॉलमुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. 19 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर धोनीने 2 धावा पूर्ण करत संघाची धावसंख्या 144 वर पोहोचवली. धोनीच्या सिक्सची चर्चा तर होतेच. मात्र, या नव्या कोऱ्या खेळाडूचा नादच केलाय. धोनीच्या बोल्डचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल देखील होतोय.