Shubman Gill and Sara Tendulkar: शुभमन गिल-सारा तेंडुलकरचं ब्रेकअप? एकमेकांना केलं अनफॉलो

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचं ब्रेकअप? नक्की काय बिनसलं?  

Updated: Aug 24, 2022, 08:33 PM IST
Shubman Gill and Sara Tendulkar: शुभमन गिल-सारा तेंडुलकरचं ब्रेकअप? एकमेकांना केलं अनफॉलो title=

Shubman gill and sara Tendulkar: टीम इंडियाचा (Team India) स्टार ओपनर शुभमन गिलने (Shubman Gill) नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे (zimbabwe) दौऱ्यात दमदार कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतली पहिली सेंच्युरी करत त्याने सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) एक रेकॉर्डही ब्रेक केला.

या कामगिरीनंतर शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांचं नाव पुन्हा एकदा ट्रेंड होतंय. सोशल मीडियावर दोघांच्या अफेअरची चर्चा रंगलेली असते. 

पण आता मोठी बातमी समोर आली आहे. शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर (Instagaram) एकमेकांना अनफॉलो केलं आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर त्यांच्या ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. (shubman gill and sara tendulkar unfollowed each other on instagram)

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. पण ती केवळ अफवा असल्याचं समोर आलं. दोघांनीही याबाबत कधीही जाहीर वक्तव्य केलं नाही. 2019 आयपीएलदरम्यान शुभमन आणि साराला नोटीस करण्यात आलं, त्यानंतर त्या दोघांच्या अफेरची चर्चा सुरु झाली.

शुभमन गिल IPL 2019 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाकडून खेळला होता. या हंगामानंतर शुभमनने रेंज रोवर कार विकत घेतली होती. आपल्या नव्या कारसोबत शुभमनने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोवर सारा तेंडुलकरने कमेंट दिली होती.

साराने हार्टचा इमोजी टाकत कमेंटमध्ये 'अभिनंदन' असं लिहिलं होतं. याला रिप्लाय करत शुभमननेही हार्ट इमोजी टाकत सारा तेंडुलकरचे आभार मानले होते. यानंतरच शुभमन आणि साराच्या अफेअरची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. 

हार्दिक पांड्यानेही (Hardik Pandya) गिल आणि साराच्या पोस्टवर कमेंट केली होती. हार्दिकने साराच्या बाजूने गमतीने टिप्पणी करत, 'शुबमन गिलचं स्वागत आहे, सारातर्फे' असं लिहिलं होतं. 

पण आता इन्स्टाग्रामवर शुभमन आणि साराने एकमेकांना अनफॉलो केल्याने दोघांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु झाली आहे.