Team India: ऋषभ पंतचा धक्कादायक खुलासा, T20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला सतावतेय ही मोठी भीती

Rishabh Pant: T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय क्रिकेट (Team India) संघासाठी खूप वाईट होता.  

Updated: Aug 18, 2022, 08:59 AM IST
Team India: ऋषभ पंतचा धक्कादायक खुलासा, T20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला सतावतेय ही मोठी भीती title=

मुंबई : Rishabh Pant: T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय क्रिकेट (Team India) संघासाठी खूप वाईट होता. टीम इंडिया या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचा सर्वात मोठा दावेदार मानला जात होता, मात्र खराब कामगिरीमुळे त्यांना पहिल्याच फेरीत बाहेर पडावे लागले. इतकंच नाही तर वर्ल्डकपसारख्या मंचावर पहिल्यांदाच टीम इंडियाचा पराभवही पाकिस्तान संघाने केला. पण यंदा संघाच्या नजरा पुनरागमनावर असतील आणि ऑस्ट्रेलियात कर्णधार रोहित शर्माला इतिहास रचण्याची इच्छा आहे. मात्र, त्याआधी संघाला वेगळ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. 

पंतचा मोठा खुलासा  

टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत म्हणाला की, या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी संघ थोडा चिंताग्रस्त आहे. ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये ऑस्‍ट्रेलियामध्‍ये टी-20 विश्‍वचषक खेळवला जाणार आहे. "आता विश्वचषक जवळ आला आहे, संपूर्ण संघ थोडा चिंताग्रस्त आहे, परंतु त्याचवेळी आम्हाला एक संघ म्हणून आमचे 100 टक्के योगदान देणे आणि प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्यावर आहे, असे पंत एका कार्यक्रमाच्या प्रसंगी म्हणाला.  

2013 मध्ये शेवटचे विजेतेपद जिंकले

भारताने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रुपाने शेवटची आयसीसी स्पर्धा जिंकली होती आणि आता ही प्रतीक्षा संपवण्यास उत्सुक आहेत. गेल्यावेळी भारत T20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतच बाद झाला होता. पंत म्हणाला, 'आशा आहे की, यावेळी टीम इंडिया आता अंतिम फेरीत पोहोचेल आणि टीमसाठी सर्वोत्तम कामगिरी करेल. ऑस्ट्रेलियात आम्हाला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळतो. त्यामुळे आपण जिंकू शकतो असे दिसते.

शेवटची कामगिरी खूपच खराब  

T20 विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. टीम इंडियाला पहिल्यांदा पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर न्यूझीलंड संघाने दुसऱ्या सामन्यातही भारताचा पराभव केला. सलग दोन पराभव पत्करल्यानंतर टीम इंडिया या स्पर्धेच्या ग्रुपमधूनच बाहेर पडली. मात्र यावेळी भारतीय संघ पुनरागमन करेल आणि ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा इतिहास रचला जाईल, अशी आशा ऋषभ पंत यांने व्यक्त केली आहे.