Team India Squad Announced : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, BCCI चे संघात मोठे बदल!

भारतीय संघात मोठे बदल, टीम इंडियामध्ये दोन पुणेकरांचा स्थान!

Updated: Dec 27, 2022, 11:53 PM IST
Team India Squad Announced : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, BCCI चे संघात मोठे बदल! title=

Team India Squad vs Srilanka : श्रीलंका संघ भारतीय दौऱ्यावर येणार असून बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. वनडेमध्ये रोहित शर्माच कर्णधारपद असणार आहे. के. एल. राहुलच्या जागी आता हार्दिक पांड्याच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडली आहे. टी-20 मालिकेसाठी पांड्याला कर्णधारपदाची लॉटरी लागली आहे. तर स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. (Trending ind vs srilanka team india announced for Sri Lanka T20I tour latets marathi sport news)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी पेटीएम इनसायडरवर तिकीटांची विक्री सुरु करण्यात आली आहे. कोविड संदर्भात कुठली ही सूचना आली नाही, त्यामुळे संपूर्ण स्टेडियम मधील तिकीट उपलब्ध असणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंकेमधील तीन सामन्यांची मालिका होणार असून तिन्ही सामने पहिला सामना मुंबई, दुसरा पुणे तर तिसरा सामना राजकोट येथे होणार आहे. पुण्यामध्ये दुसरा सामना 5 जानेवारीला होणार आहे. 

टी-20 साठी भारतीय संघ- हार्दिक पंड्या (c), इशान किशन (wk), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

 

 

वनडेसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार),  शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मो. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.