श्रीलंकेनंतर आता कांगारूंना लोळवण्यासाठी 'विराट'सेना सज्ज

श्रीलंकेविरुद्धच्या ३ टेस्ट, ५ वनडे आणि १ टी-20 अशा सगळ्या ९ मॅच जिंकल्यानंतर भारतीय टीमचा सामना आता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

Updated: Sep 7, 2017, 06:50 PM IST
श्रीलंकेनंतर आता कांगारूंना लोळवण्यासाठी 'विराट'सेना सज्ज  title=

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या ३ टेस्ट, ५ वनडे आणि १ टी-20 अशा सगळ्या ९ मॅच जिंकल्यानंतर भारतीय टीमचा सामना आता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ५ वनडे आणि ३ टी-20 मॅचची सीरिज खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाची टीम भारतामध्ये येणार आहे. १७ सप्टेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून १३ ऑक्टोबरला शेवटची म्हणजेच तिसरी टी-20 खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचचं वेळापत्रक

१७ सप्टेंबर- पहिली वनडे- चेन्नई

२१ सप्टेंबर- दुसरी वनडे- कोलकता

२४ सप्टेंबर- तिसरी वनडे- इंदोर

२८ सप्टेंबर- चौथी वनडे- बंगळुरू

१ ऑक्टोबर- पाचवी वनडे- नागपूर

७ ऑक्टोबर- पहिली टी-20- रांची

१० ऑक्टोबर- दुसरी टी-20- गुवाहाटी

१३ ऑक्टोबर- तिसरी टी-20- हैदराबाद