सुपर 8 पूर्वी रोहित शर्माला सतावतेय 'ही' चिंता; थेट बुमराहलाच केला सवाल

Team India T20 World Cup 2024 Super 8: अमेरिकेतील ग्रुप स्टेज मॅचेसमध्ये लो स्कोअरिंग सामने पहायला मिळाले. अमेरिकेतील मैदानावर फलंदाज मोकळेपणाने खेळू शकले नाही. मात्र या उलट वेस्ट इंडिजमध्ये पीचची परिस्थिती वेगळी आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 18, 2024, 04:26 PM IST
सुपर 8 पूर्वी रोहित शर्माला सतावतेय 'ही' चिंता; थेट बुमराहलाच केला सवाल title=

Team India T20 World Cup 2024 Super 8: टी 20 वर्ल्डकपमध्ये आता सुपर 8 चे सामने बाकी आहेत. यामध्ये टीम इंडियाचा सुपर 8 मधील पहिला सामना 20 जून रोजी होणार आहे. T20 वर्ल्डकप 2024 सुपर-8 च्या टप्प्याकडे वळला आहे. 20 जून रोजी बार्बाडोसमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा पहिला सामना होणार आहे. दरम्यान लीग स्टेजचे सर्व सामने अमेरिकेत खेळले गेले आणि तिथल्या पीचमुळे प्रचंड गोंधळ उडाला. आता सुपर-8 मध्ये या सर्व टीम वेस्ट इंडिजमध्ये आमनेसामने येतील. असं असूनही रोहित शर्माच्या मनात एक चिंता लागली आहे. 

रोहित शर्माला सतावतेय 'ही' चिंता

अमेरिकेतील ग्रुप स्टेज मॅचेसमध्ये लो स्कोअरिंग सामने पहायला मिळाले. अमेरिकेतील मैदानावर फलंदाज मोकळेपणाने खेळू शकले नाही. मात्र या उलट वेस्ट इंडिजमध्ये पीचची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही या काळात बदल निश्चित मानले जातायत. टीम इंडिया बार्बाडोसमध्ये सराव करत असून कर्णधार रोहित शर्माने याआधीच पीचबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी रोहितने टीमचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहला यासंदर्भात प्रश्न विचारला.

बुमराहने पीचबाबत दिली महत्त्वाची माहिती 

अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यापूर्वी रोहितने जसप्रीत बुमराहला विचारलं, 'पीच कसं आहे?' यावेळी बुमराह प्रॅक्टिससाठी देण्यात आलेल्या पीचबाबत समाधानी असल्याचं समोर आलं. लीग स्टेजमधील भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे खेळवता आला नाही. मात्र सुपर-8 सामन्यापूर्वी भारतीय टीमने नेट्समध्ये चांगला सराव केला.

अफगाणिस्तानविरूद्ध या खेळाडूची होऊ शकते टीममध्ये एन्ट्री

बार्बाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे. मात्र तरी कुलदीप यादवचा प्लेइंग 11 मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. बार्बाडोसमध्ये जसा खेळ होत राहिल त्यानंतर पीच स्लो संथ होण्याची शक्यता आहे. अशावेळी या ठिकाणी स्पिनर्सना मदत मिळू शकणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध जडेजा, अक्षर आणि कुलदीप हे तीन स्पिनर्स म्हणून टीममध्ये असू शकतात. कुलदीपचा टीममध्ये प्रवेश झाल्यास वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वगळलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.