२०११ चा वर्ल्डकप जिंकवणारे हे ४ खेळाडु २०१९ ला नसणार

असे काही खेळाडू आहेत ज्यांची आठवण २०१९ च्या वर्ल्डकपमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. 

Updated: Apr 2, 2018, 09:02 PM IST
२०११ चा वर्ल्डकप जिंकवणारे हे ४ खेळाडु २०१९ ला नसणार title=

नवी दिल्ली : भारतीय संघाने आजच्या दिवशी २ एप्रिल २०११ ला वर्ल्ड कप जिंकला होता. १९८३ च्या नंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वोच्च आनंदाचा हा क्षण होता. याचसोबत भारताचा संघ २ किंवा २ हून अधिकवेळा वर्ल्डकप जिंकणारा तिसरा संघ ठरला. आता पुढचा वर्ल्ड कप २०१९ मध्ये खेळला जाईल. पण असे काही खेळाडू आहेत ज्यांची आठवण २०१९ च्या वर्ल्डकपमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. 

आशिष नेहरा 

 २०११ च्या वर्ल्डकपमध्ये आशिष नेहरा काही विशेष कमाल दाखवू शकला नाही. पण महत्त्वाच्या खेळाडुंपैकी तो एक मानला जातो. त्यामुळे येणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये त्याची आठवण नक्कीच येईल. 

जहीर खान 

जहीर खान भारतीय संघातील टॉप बॉलर मानला जायचा. आता त्यानेही क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २०११ मधील वर्ल्डकपमध्ये जहीरच योगदान महत्त्वाच राहिल. तो सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर ठरला. संपूर्ण स्पर्धेत त्याने २१ विकेट घेतले. 

विरेंद्र सेहवाग 

भारतीय संघाचा माजी घातक बॅट्समन विरेंद्र सेहवागनेही निवृत्ती घेतली. सध्या तो आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मेंटोर आहे.

क्रिकेट कॉमेंट्रीचं वेगळेपण आणि हटके ट्विट्समुळे तो नेहमी चर्चेत असतो. २०११ च्या वर्ल्डकपमध्ये त्याच्याकडून अपेक्षेप्रमाणे झालं नाही.

पण बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने १४० बॉल्समध्ये ५ सिक्स आणि १४ फोर मारत १७५ रन्सची शानदार खेळी केली होती.  

सचिन तेंडुलकर 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही आता भारतीय संघाचा हिस्सा नाही. २०११ वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन्स बनविणारा खेळाडू ठरला.

त्याने वर्ल्डकपमध्ये ४८२ रन्स केले. फायनल मॅचमध्ये त्याची बॅट तळपली नसली तरी दोन मॅचमध्ये शतकी खेळी त्याने केली होती.