KBC 16 : 'कौन बनेगा करोडपति 16' च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकाला अमिताभ बच्चन यांनी असा प्रश्न विचारला की त्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं. अमिताभ बच्चन हे त्या स्पर्धकांच्या नुकत्याच झालेल्या लग्नाविषयी बोलताना हनीमून शब्दाविषयी विचारताना दिसले. या स्पर्धकाचं नाव दिलीप कुमार बरसीवाल असं होतं. अमिताभ यांनी यावेळी विचारलं की ना हनीचा संबंध हा चंद्राशी आहे, ना चंद्राचा संबंध हनीशी आहे. तर हा शब्द तयार कसा झाला? दिलीप उत्तर देत म्हणाले, 'सर, तुम्हाला याविषयी आणखी माहित होईल.'
दिलीप कुमार बरसीवाल यांचं उत्तर ऐकताच अमिताभ बच्चन म्हणाले, ऐका, तुम्ही तुमच्या पत्नीला हेच सांगा की तुचं माझी चंद्र आहे आणि तुच माझी हनी आहे. संपलं इथेच. त्यानंतर पुढे दिलीप कुमार बरसीवाल यांना तीन लाख रुपयांसाठी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की 2024 मध्ये 51 शक्ती पीठं आणि 12 ज्योतिर्लिंगंचे पुजाऱ्यांचे संम्मेलन कुठे झाले?
A) उज्जैन
B) मदुरै
C) वाराणसी
D) दिल्ली
दिलीप या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही आणि त्यांना इथेच खेळ सोडावा लागाला. दरम्यान, खेळ सोडण्याआधी अमिताभ त्यांना एक पर्याय निवडण्यास सांगतात. त्यावेळी ते सी हा पर्याय निवडतात आणि हेच योग्य उत्तर असतं.
दिलीप कुमार यांच्यानंतर हॉटसीटवर दिल्लीच्या प्रियांका बसतात. त्या स्वत: एक प्रोफेसर आहेत आणि बी.टेकच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांनी 80 हजारच्या प्रश्नासाठी डबल डिप लाइफलाइनचा वापर केला. काय होता तो प्रश्न?
2024 मध्ये नोबेल शांती पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलेले निहोन हिडैंक्यो कोणत्या देशातून होते?
A) दक्षिण कोरिया
B) चीन
C) जापान
D) रशिया
या प्रश्नाचं त्या C उत्तर देताना आणि ते योग्य असतं.
दरम्यान, नेहमी प्रमाणेच यावेळी देखील अमिताभ यांनी हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाशी गप्पा मारतात त्याप्रमाणे यावेळी त्यांनी रुचिला तिच्या एआईमधल्या काळाविषयी विचारलं. त्यावेळी रुचिनं सांगितलं की मी जेव्हा बी.टेकसाठी अॅडमिशन घेतलं होतं. तेव्हा माझ्या बॅचमध्ये सगळ्यात जास्त मुलं होती. त्यामुळे ते नेहमी बोलायचे की मुली काही करु शकत नाही आणि फक्त मुलंच टॉप करु शकतात. माझ्या आईनं त्यांना आव्हान दिलं की 4 वर्षांनंतर टॉप करणार आहे. 4 वर्षांमध्ये मी टॉप केलं आणि गोल्ड मेडलिस्ट झाले. इतकंच नाही तर अरविंद केजरीवाल यांनी माझा सन्मान केला. ऐकताच बिग बींसोबत तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या.