भुवयांचा आकार व्यवस्थित पाहा... त्यातच दडलंय तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं गुपित

Personality Test : व्यक्तिमत्त्वं आणि भुवयांचा नेमका संबंध काय? व्यक्तिमत्त्वं ओळखण्याचं हे माध्यम कधी तुम्ही वापरून पाहिलंय?   

सायली पाटील | Updated: Dec 26, 2024, 12:21 PM IST
भुवयांचा आकार व्यवस्थित पाहा... त्यातच दडलंय तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं गुपित  title=
Personality test shape of your eyebrows reveals about your personality know more

Personality Test : भुवया... व्यक्तीच्या चेहऱ्यावर असणाऱ्या या लहानशा खुणा. अनेकांचा चेहरा याच भुवया उठावदार करतात. तर, एखाद्याच्या चेहऱ्याला गंभीर रुप देतात. जाणून आश्चर्य वाटेल, पण याच भुवया व्यक्तिच्या स्वभावापासून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू नकळतच उलगडत असतात. या भुवया नेमक्या इतक्या बोलक्या कशा, तुम्हालाही जाणून घ्यायचंय? 

दाट भुवया 

जर तुमच्या भुवया दाट असतील तर तुम्ही एक स्वच्छंदी व्यक्तिमत्त्वं आहात. नैसर्गिकसौंदर्यात तुम्ही रमता आणि आयुष्य मनमुराद जगता. भावनांपेक्षा वस्तुनिष्ठतेवर विश्वास ठेवून तुम्ही निर्णय घेता. 

बारीक भुवया 

भुवयांचा आकार काहीसा बारीक असल्यास अशा व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो. ते कायमच इतराचा सल्ला ग्राह्य धरतात. अशा मंडळीना गरजेपेक्षा अधिक विचार करण्यामुळं त्रास होतो, इतकंच नव्हे तर त्यांच्यावर लगेचच दुसऱ्याचा प्रभाव पडतो. 

कंसाकार भुवया

साधारण कंसासारखा आकार असणाऱ्या भुवया असणाऱ्या व्यक्ती कमालीच्या महत्त्वाकांक्षी असतात. त्यांच्यामध्ये नेतृत्त्वंक्षमता असते. शिवाय या व्यक्ती संवेदनशीलही असतात. 

सरळ रेषेतील भुवया

सरळ रेषेप्रमाणं भुवया असणाऱ्या व्यक्ती अतिशय तत्वनिष्ठ असतात. ते कायमच तत्थांवर विश्वास ठेवतात. वैयक्तिक आणि कार्यालयीन आयुष्य दोन वेगळ्या गोष्टी असून त्यांना तसंच गणण्याची कला या व्यक्तींमध्ये असते. 

हेसुद्धा वाचा : Kazakhstan plane crash video : अल्लाहच्या नावाचा धावा अन् आक्रोश; विमान क्रॅश होण्यापूर्वीची थरकाप उडवणारी दृश्य समोर... 

जुळ्या भुवया 

एखाद्या व्यक्तीच्या भुवया जुळलेल्या असतील त्या व्यक्तीची कल्पनाशक्ती अफाट असते. ही मंडळी स्वप्नपूर्तीच्या दिशेनं झपाझप पावलं टाकतात. मनानं अतिशय निर्मळ असणाऱ्या या व्यक्ती कायमच कावेबाजांना ओळखण्यात चूक करतात, ही यांची दुखरी बाजू. 

दोन भुवयांमध्ये बरंच अंतर 

दोन भुवयांमध्ये बरंच अंतर असणाऱ्या व्यक्ती इतरांची काळजी घेणाऱ्या असतात. परखड स्वभाव असला तरीही या मंडळींवर लगेचच इतरांचा प्रभाव पडतो. अनेकदा ते महत्त्वाच्या क्षणी विचित्रपणे व्यक्त होत त्या क्षणाला मुकतातही. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)