हॉकी खेळाडूनं मॅच सोडून बाळाला पाजलं दूध

मल्याळम मॅग्झिन गृहलक्ष्मीच्या कव्हर पेजवर अभिनेत्री गीलू जोसेफचा फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.

Updated: Apr 2, 2018, 08:43 PM IST
हॉकी खेळाडूनं मॅच सोडून बाळाला पाजलं दूध title=

मुंबई : मल्याळम मॅग्झिन गृहलक्ष्मीच्या कव्हर पेजवर अभिनेत्री गीलू जोसेफचा फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये गीलू जोसेफ बाळाला दूध पाजत असताना दाखवण्यात आली होती. या फोटोवर काहींनी टीका केली तर अनेकांनी या फोटोचं कौतुक केलं. आम्हाला रोखून बघणं बंद करा, असं केरळच्या आई म्हणत आहेत, असं या कव्हर फोटोवर लिहिण्यात आलं होतं.

गृहलक्ष्मी मॅग्झिनच्या या फोटोनंतर आता आणखी एक फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. कॅनडाच्या हॉकी खेळाडूचा हा फोटो आहे. मॅचदरम्यान या खेळाडूनं तिच्या बाळाला दूध दिलं. सेराह स्मॉल असं या खेळाडूचं नाव आहे. सेराह ही एक शिक्षिकाही आहे.

हॉकीची मॅच खेळण्यासाठी सेराह तिच्या दोन महिन्यांच्या मुलीबरोबर आली होती. पण मॅचला येताना सेराह ब्रेस्ट पंप आणायला विसरली होती. त्यामुळे सेराहनं मॅचच्या ब्रेकमध्ये लॉकर रूममध्ये जाऊन मुलीला दूध पाजलं. सेराहचा या फोटोचं कौतुक होत आहे. मी काहीही वेगळं केलेलं नाही. जगातल्या सगळ्या महिला असंच करतात, अशी प्रतिक्रिया सेराहनं दिली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या खासदारानंही केलं होतं स्तनपान

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या खासदार लेरीसा वाटर्स बाळाला दूध पाजल्यामुळे चर्चेत आल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये लेरीसा यांनी बाळाला दूध पाजलं होतं. दूध पाजतानाच लेरिसा संसदेला संबोधित करत होत्या. माझी मुलगी संसदेत स्तनपान करणारी पहिलीच आहे याचा मला अभिमान आहे, असं लेरीसा म्हणाल्या होत्या.  

Breastfeeding

गृहलक्ष्मी मॅग्झिनचा कव्हर फोटो