'रडीचा डाव' म्हणून टीका झालेला 'तो' नियम हद्दपार; यंदा World Cup मध्ये सामना टाय झाला तर...

ICC ODI World Cup 2023 Rules: 2019 च्या वर्ल्डकपमध्ये फायनल सामना हा इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगला होता. हा फायनल सामन्यातील बाऊंड्री काऊंटचा रूल ( boundary count rule ) वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे आता आयसीसीने मोठा निर्णय घेत नियम बदलून टाकलाय. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 2, 2023, 08:26 AM IST
'रडीचा डाव' म्हणून टीका झालेला 'तो' नियम हद्दपार; यंदा World Cup मध्ये सामना टाय झाला तर... title=

ICC ODI World Cup 2023 Rules: अवघ्या 3 दिवसांनी वर्ल्डकपला ( ICC ODI World Cup 2023 ) सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबरपासून भारतात महासंग्राम रंगणार आहे. यामध्ये पहिला सामना इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड ( Eng vs Nz ) यांच्यामध्ये रंगणार आहे. दरम्यान वर्ल्डकपमधील आणि इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंडचा ( Eng vs Nz ) सामना म्हटलं की, क्रिकेट चाहत्यांना आठवतो तो भूतकाळ. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये फायनल सामना हा इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगला होता. हा फायनल सामन्यातील बाऊंड्री काऊंटचा रूल ( boundary count rule ) वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे आता आयसीसीने मोठा निर्णय घेत नियम बदलून टाकलाय. 

2019 ICC क्रिकेट वर्ल्डकप ( ICC ODI World Cup 2023 ) हा 12 वा क्रिकेट वर्ल्डकप होता. या वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंडची टीम आमनेसामने आली होती. यावेली पहिला 50 ओव्हर्सचा सामना बरोबरीत सुटला. इतकंच नाही तर त्यानंतर सुपर ओव्हर देखील बरोबरीत संपली. यानंतर बाऊंड्री काऊंटद्वारे ( boundary count rule ) वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं.

त्यानंतर हा बाऊंड्री काऊंटचा ( boundary count rule ) नियम बराच वादग्रस्त मानला जात होता. आयसीसीच्या या नियमावर चाहत्यांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर आयसीसीने ( ICC ) या नियमात बदल केला. जर सामन्यानंतर सुपर ओव्हर टाय झाली, तर त्या स्थितीत निकाल जाहीर होईपर्यंत सुपर ओव्हर्स सतत खेळल्या जाणार आहेत. 

काय घडलं होतं 2019 च्या फायनल सामन्यात?

2019 साली नॉक आऊट फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही टीम्सने उपांत्य फेरीत विजय मिळवून अंतिम फेरी गाठली होती. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 241 रन्स केले. त्यानंतर बेन स्टोक्सच्या अर्धशतकामुळे इंग्लंडनेही 50 ओव्हर्समध्ये 241 रन्स केले. अखेरी हा सामना बरोबरीत सुटला. 

सामना बरोबरीत सुटल्याने दोन टीम्समध्ये एक सुपर ओव्हर घेण्यात आली. मात्र ही  सुपर ओव्हर देखील बरोबरीत राहिली. त्यानंतर इंग्लंडला बाऊंड्री काउंटबॅक नियमाच्या आधारे विजेता घोषित करण्यात आलं. त्यावेळी इऑन मॉर्गनच्या नेत्तृत्वाखाली इंग्लंडची टीमने पहिल्यांदाचा विजेतेपदावर नाव कोरलं होतं.