World Cup 2023: 12 वर्षांनंतर वर्ल्डकपमध्ये झाली 'या' टीमची एन्ट्री; टीम इंडियाला देणार टफ फाईट?

ICC ODI World Cup 2023: वर्ल्डकप कोणताही असो तो कोणत्याही टीमसाठी खास असतो. मात्र यावेळी वर्ल्डकपमध्ये ( ICC ODI World Cup 2023 ) अशी एक टीम आहे, जी 12 वर्षांनंतर वर्ल्डकप खेळताना दिसणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 2, 2023, 07:04 AM IST
World Cup 2023: 12 वर्षांनंतर वर्ल्डकपमध्ये झाली 'या' टीमची एन्ट्री; टीम इंडियाला देणार टफ फाईट? title=

ICC ODI World Cup 2023: आयसीसी वनडे वर्ल्ड कप ( ICC ODI World Cup 2023 ) येत्या 5 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. यंदाच्या वर्ल्डकप भारतात रंगणार असल्याने चाहते मात्र प्रचंड उत्सुक आहेत. 45 दिवस चालणाऱ्या या वर्ल्डकपमध्ये 10 टीम्सचा समावेश असणार आहे. तर तब्बल 48 सामने या दरम्यान खेळवले जाणार आहेत. वर्ल्डकप कोणताही असो तो कोणत्याही टीमसाठी खास असतो. मात्र यावेळी वर्ल्डकपमध्ये ( ICC ODI World Cup 2023 ) अशी एक टीम आहे, जी 12 वर्षांनंतर वर्ल्डकप खेळताना दिसणार आहे. 

12 वर्षांनंतर वर्ल्डकपमध्ये झाली या टीमची एन्ट्री

नेदरलँडची टीम 12 वर्षांनंतर वनडे वर्ल्डकप ( ICC ODI World Cup 2023 ) खेळताना दिसणार आहे. गेल्या सलग दोन वर्ल्डकप स्पर्धांमधून ही टीम बाहेर होती. त्यानंतर आता नेदरलँडची टीम 2023 च्या आयसीसी वर्ल्डकपमधून क्रिकेटच्या मेगा स्पर्धेत परतलीये. याआधी नेदरलँडची टीम चार वेळा (1996, 2003, 2007 आणि 2011) वनडे फॉर्मेटमधील वर्ल्डकप खेळली आहे.

वर्ल्डकप क्वॉलिफायर्समध्ये रंगली धमाल

2023 वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत उपविजेते राहून नेदरलँड्सने यंदाच्या वनडे वर्ल्डकपसाठी ( ICC ODI World Cup 2023 ) पात्रता मिळवली आहे. नेदरलँड्सने वर्ल्डकप पात्रता फेरीमध्ये दोन वेळचे चॅम्पियन वेस्ट इंडिज, स्कॉटलंड, अमेरिका, ओमान आणि नेपाळ यांना पराभूत करून वर्ल्डकपमध्ये प्रवेश केलाय. 

नेदरलँड्सने आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये केवळ स्कॉटलंड आणि नामिबियासारख्या टीम्सनाच पराभूत केलंय. वनडे क्रिकेटमधील नेदरलँडचा यंदाचा विक्रम त्यांच्या क्रिकेट इतिहासातील एकूण विक्रमाच्या तुलनेत खूपच चांगला राहिलाय. अशा स्थितीत यावेळी ती अनेक टीमचा खेळ खराब करू शकते.

कशी आहे 2023 साठी नेदरलँड्सची टीम

स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ'डॉड, बास डी लीडे, विक्रमजीत सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन एकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लाइन, वेस्ली बॅरेसी (विकेटकीपर), साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद, सायब्रँड एंजेलब्रेक्ट.