मुंबई हादरली! 17 वर्षीय मुलाचा महिलेवर घरात घुसून बलात्कार, मुलांसमोर चाकूचा धाक दाखवला अन्...

Mumbai News : गुन्हेगारी कृत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्यानं वाढ होत असून, मानखुर्दमध्ये घडलेल्या एका घटनेनं सध्या मुंबई हादरली आहे.   

Updated: Jan 15, 2025, 12:44 PM IST
मुंबई हादरली! 17 वर्षीय मुलाचा महिलेवर घरात घुसून बलात्कार, मुलांसमोर चाकूचा धाक दाखवला अन्... title=
Mumbai news mankhurd 17 years old boy raped 27 year old women latest update

मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई : (Mumbai News) मानखुर्द मध्ये अल्पवयीन मुलाने महिलेवर बलात्कार केल्याच्या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. उपलब्ध माहितीनुसार मुंबईतील मानखुर्द येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने केला 27 वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. 

सदर प्रकरणाची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. ही घटना गेल्या सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. गृहिणी असलेली ही महिला तिच्या दोन मुलांसह घराच्या दरवाजाजवळ बसली होती, तर तिचा पती कामावर गेला होता. 
 
या महिलेच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या आरोपीने तिच्या घरात घुसून दरवाजा आतून बंद केला आणि चाकूचा धाक दाखवला. महिलेने  प्रतिकार केल्यास तिला, तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. त्यानंतर त्याने घराबाहेर पडताना दरवाजा बाहेरून बंद केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

आरोपी तिथून निघताक्षणी महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला. हे ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेऊन दरवाजा उघडला. तिच्या पतीला घडलेला प्रसंग सांगून पोलिसांना याप्रकरणाची माहिती देण्यात आली. पीडितेच्या जबाबानंतर याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि संशयिताचा शोध घेण्यासाठी आठ पोलिस पथकं तयार करण्यात आली . 

हेसुद्धा वाचा : संभाजीनगरात खळबळ! शर्टाची कॉलर उडवतो म्हणून तरुणाचा गळा चिरला, घरात घुसून केला हल्ला

 

आरोपी, हा स्थानिक रहिवासी असून घटनेपासून फरार होता. त्यानं आपला फोनही बंद ठेवला होता. तो स्वत:च्या घरी येण्यास टाळत होता. सोमवारी रात्रभर शोध घेतल्यानंतर मंगळवारी दुपारी अखेर त्याला अटक करण्यात आली. आरोपी अल्पवयीन आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी पोलीस त्याच्या जन्माचा दाखला आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. दरम्यान, वय पडताळणीच्या निकालाच्या आधारे पुढील कारवाई निश्चित केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.