टी-२० च्या इतिहासात टीम इंडिया पहिल्यांदा खेळणार असा सामना

भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात मंगळवारपासून टी-२० ट्राय सिरीज सुरु होत आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 5, 2018, 08:02 PM IST
टी-२० च्या इतिहासात टीम इंडिया पहिल्यांदा खेळणार असा सामना title=

मुंबई : भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात मंगळवारपासून टी-२० ट्राय सिरीज सुरु होत आहे.

पहिल्यांदाच होणार असं

मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता पहिला सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे. ही टुर्नामेंट भारतासाठी खास आहे. भारताने पहिला टी-२० सामना २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळला होता. तेव्हापासून आजपर्यंत टीम इंडियाने कोणत्याही टी-२० ट्राय सिरीजमध्ये भाग नाही घेतला.

तिरंगी मालिका

पहिल्यांदाच भारतीय टीम क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये तिरंगी मालिका खेळणार आहे. टीम इंडिया शिवाय दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिज यांनी देखील कधी तिंरगी मालिका नाही खेळली.

कोणी खेळले सर्वाधिक सामने

भारत जर या सिरीजमधले सर्व सामने खेळतो तर टीम इंडिया १०० टी-२० सामन्यांच्या क्लबमध्ये सहभागी होईल. भारताने आतापर्यंत ९४ सामने खेळले आहेत. त्यापैकी ५७ सामने भारताने जिंकले आहेत तर ३४ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. एक सामना ड्रॉ झाला आहे तर २ सामन्यांचा निकाला हाती आलेला नाही. सर्वाधिक १२३ सामने पाकिस्तानने खेळले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने १०० तर न्यूझीलंडने १११ सामने खेळले आहेत. श्रीलंकाने १०४ तर दक्षिण आफ्रिकेने १०३ सामने खेळले आहेत.