मुंबई: भारतीय क्रिकेटपटूचे मैदानात वाद होत असतात आणि त्याचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत. मात्र एका क्रिकेटपटूनं संताप अनावर न झाल्यानं वृद्धाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू आणि वाद हे नातं अगदी सखोल आहे. एकदा अंबाती रायडूने एका वृद्ध व्यक्तीला मारहाण केली. टीम इंडियाकडून खेळलेला अंबाती रायुडू वेगवान वेगाने कार चालवत होता. त्याच वेळी रस्त्यावर फिरायला आलेल्या वृद्ध व्यक्तीला त्याचा कारची धडक बसली.
कारचा धक्का लागल्याने वृद्ध व्यक्ती चिडला. सुदैवानं मोठी दुर्घटना झाली नव्हती. मात्र संतापलेल्या वृद्ध व्यक्तीने त्याला बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे अंबातीचा पारा वाढला. त्याने गाडीतून बाहेर येऊन वृद्धाच्या कानशिलात लगावली. रायडूच्या हा व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. ही घटना 2017 मध्ये समोर आली होती. तेथे उपस्थित लोकांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले.
Ambati Rayudu fight and abusive language with pedestrian.Not a sportsmanship behavior of Cricketer .Should be ashamed of himself! pic.twitter.com/tbQ2x2zyfN
— Jagan Reddy (@jaganreddy85) August 31, 2017
अंबाती रायडूची तक्रार पोलिसांकडे केली होती. याआधी अंबाती आणि हरभजन सिंगचा 2016 मध्ये आयपीएल दरम्यान झालेला वाद खूपच गाजला होता. त्यानंतर हा सगळा प्रकार यामुळे रायडूच्या अडचणी वाढल्या. काही लोकांनी बीसीसीआयला रायडूची तक्रार करण्याचाही सल्ला दिला होता. त्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.