अंधश्रद्धेचा कहर! 'हा' क्रिकेटर चक्क बॅगेत शेण ठेवायचा, कोण आहे तो?

क्रिकेटमध्ये काही खेळाडू हे कामगिरीसह नशिबावरही विश्वास ठेवतात.  

Updated: Jul 6, 2021, 10:31 PM IST
अंधश्रद्धेचा कहर!  'हा' क्रिकेटर चक्क बॅगेत शेण ठेवायचा, कोण आहे तो? title=

मुंबई : क्रिकेटमध्ये काही खेळाडू हे कामगिरीसह नशिबावरही विश्वास ठेवतात. अनेक खेळाडू हे ठरलेल्या बॅटनेच खेळतात. त्या खेळाडूंसाठी काही वस्तू या फार स्पेशल असतात. त्यामुळे ते नेहमीच या लकी वस्तू क्रिकेट दरम्यान वापरतात. पण एका खेळाडूने याबाबत सर्वांनाच मागे टाकलंय. हा खेळाडू चक्क किट बॅगमध्ये गायीचं शेणच ठेवायचा. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मखाया अॅन्टिनी  (Makhaya Ntini) आपल्या किटमध्ये शेण ठेवायचा. याबाबतचा खुलासा स्वत: मखायाने केला होता. (Cricketer Makhaya Antini used to keep cow dung in his kit bag) 
   
मखाया काय म्हणाला होता?

"संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत मी माझ्या किट बॅगमध्ये गायीच्या शेणाचं पॅकेट ठेवायचो. शेणाचं पॅकेट मी माझ्यासाठी लकी चार्म समजायचो. त्या पॅकेटमुळे मी नेहमीच जमिनीशी घट्ट आणि एकरुप राहिलो. मैदानात दमदार कामगिरी करता यावं, यासाठी मी त्या शेणाच्या पाकीटाला श्रद्धेने स्पर्श करायचो. ते माझ्यासाठी नेहमीच लकी ठरलं", असा खुलासा मकायाने ESPN cricinfo च्या विशेष कार्यक्रमात केला होता.   

बलात्काराचे गंभीर आरोप

मखायाची क्रिकेट कारकिर्द ऐन भरात होती. या दरम्यान त्याच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप लगावण्यात आले होते. 21 वर्षीय तरुणीने मखायावर बलात्काराचे गंभीर आरोप केले होते.  यानंतर न्यायालयाने या प्रकरणी मखायाला शिक्षा सुनावली. मखाया शिक्षा भोगल्यानंतर पुन्हा कमबॅक केलं. त्यानंतर त्याने धमाकेदार कामगिरी केली.