ENG vs IND| टी 20 साठी राहुल द्रवीड नाही तर 'हा' दिग्गज असणार कोच?

टीम इंडियाचा कोच आता द्रविड नाही तर.... का बदलला कोच? जाणून घ्या कारण

Updated: Jul 5, 2022, 03:31 PM IST
ENG vs IND| टी 20 साठी राहुल द्रवीड नाही तर 'हा' दिग्गज असणार कोच? title=

मुंबई : टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. पाचवा कसोटी सामना सुरू आहे. याशिवाय टीम इंडियाला 3 वन डे आणि 3 टी 20 सामन्यांची सीरिज खेळायची आहे. टी 20 सोडून सगळ्या सीरिजचं नेतृत्व राहुल द्रवीड यांच्याकडे असणार आहे. मात्र टी 20 मधील पहिल्या सामन्याचं कोचिंग मात्र राहुल द्रवीड करणार नाहीत. 

टी 20 सीरिजमधील पहिल्या सामन्यात कोच म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण असणार आहेत. पाचव्या कसोटी सामन्यानंतर राहुल द्रवीडला आराम मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यापासून पुन्हा राहुल द्रविड कोच म्हणून कमान सांभाळणार आहेत. 

टी 20चा पहिला सामना एजबेस्टन इथे खेळवण्यात येणार आहे. हा सामना 7 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

कसोटी सामना 5 जुलै रोजी संपेल. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 जुलैला टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात द्रविडला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाची कमान संभाळण्याची शक्यता आहे. 

याचं कारण म्हणजे कसोटी आणि टी-20 सामन्यांमध्ये फक्त एका दिवसाचे अंतर आहे. मात्र, पहिल्या टी-20 नंतर द्रविड पुन्हा उर्वरित सामन्यांची धुरा सांभाळणार आहे. पहिल्या टी 20 सामन्यात दिग्गज खेळाडूंना देखील आराम देण्यात येणार आहे. जे खेळाडू कसोटी सामना खेळले आहेत त्यांच्यासाठी हा नियम असणार आहे.