T20 World Cup : सलग 8 वा वर्ल्ड कप खेळणार हे क्रिकेटर, टीम इंडियाच्या खेळाडूचा समावेश

टीम इंडियाने 2007 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिलाच T 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकण्याची कामगिरी केली होती. 

Updated: Sep 16, 2022, 10:12 PM IST
T20 World Cup : सलग 8 वा वर्ल्ड कप खेळणार हे क्रिकेटर, टीम इंडियाच्या खेळाडूचा समावेश  title=

मुंबई : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्व चषकात (T20 World Cup 2022) भारतीय संघ (Team India) विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. T20 विश्वचषक 2007 पासून आयोजित केला जात आहे. तेव्हापासून गेल्या ७ टी२० विश्वचषकांच्या प्रत्येक स्पर्धेत फक्त 2 खेळाडू सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्व चषकातही ते खेळताना दिसणार आहेत. या 2 खेळाडूंचा हा सलग 8वा टी 20 वर्ल्ड कप असणार आहे. ते 2 अनुभवी क्रिकेटर कोण आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.  (team india captain and bangladesh captain rohit sharma and shakib al hasan will play consistent 8th t 20 world cup)

भारतीय खेळाडूचा समावेश  

टीम इंडियाने 2007 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिलाच T 20 वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंतच्या प्रत्येक टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माचा समावेश करण्यात आला. रोहितने टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळल्या गेलेल्या 33 सामन्यांमध्ये 38.50 च्या सरासरीने 847 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित चौथ्या क्रमांकावर आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यावेळी विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे.

दुसरा खेळाडू कोण? 

बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसन आहे जो आतापर्यंत प्रत्येक टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळलाय.  शाकिब अल हसन यावेळी बांगलादेशचा कॅप्टन आहे. शाकिबने T 20 वर्ल्ड कपमधील 31 सामन्यांमध्ये 26.84 च्या सरासरीने 698 धावा केल्या आहेत आणि 41 विकेट्सही घेतल्या आहेत.