T20 World Cup: डगआउटमध्येच नाही तर ड्रेसिंग रूममध्येही Rohit Sharma ला कोसळलं रडू!

डगआऊटमध्येच नाही तर ड्रेसिंग रूममध्येही भारतीय कर्णधाराला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलेलं नाही. ड्रेसिंग रूममध्येही त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

Updated: Nov 11, 2022, 10:48 PM IST
T20 World Cup: डगआउटमध्येच नाही तर ड्रेसिंग रूममध्येही Rohit Sharma ला कोसळलं रडू! title=

T20 World Cup: टी-20 टीम इंडियाचं वर्ल्डकप (T20 World Cup:) जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा अपूर्णच राहिलं. सेमी फायनलच्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून (England) 10 विकेट्सने (INDvsENG) पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान या पराभवाने भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) इतका भारावून गेला की तो डगआउटमध्ये जाऊन रडताना दिसला. मात्र केवळ डगआऊटमध्येच नाही तर ड्रेसिंग रूममध्येही भारतीय कर्णधाराला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलेलं नाही. ड्रेसिंग रूममध्येही त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

यावेळी ड्रेसिंग रूममध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी रोहितला शांत केलं. यानंतर टीमचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी एक भाषण केलं. शिवाय रोहितने देखील सहकारी खेळाडूंसमोर आपली मनं सांगितली.

खेळाडूंनी मारली एकमेकांना मिठी

टीम इंडियाचे खेळाडू घरी परतण्यासाठी सामान पॅक करत होते. यावेळी रात्री उशिरा हॉटेलमध्ये एक छोटी बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारली. नेटमध्ये सातत्यपूर्ण गोलंदाजी केल्याबद्दल टीम मॅनेजमेंटने राखीव गोलंदाज मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचे आभारही मानले.

द्रविडने थोपटली रोहितची पाठ

सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव झाला. रडू आवरणं रोहितला शक्य नव्हतं. यावेळी त्याचे पाणावलेले डोळे कॅमेरातही कैद झालेत. रोहित एकटात बसून रडत असताना एक खास व्यक्ती त्याच्या जवळ आली आणि त्याने त्याला धीर दिला. 

डग आऊटमध्ये रोहित शर्मा एकटाच रडत होता, त्यावेळी तिथे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड बसले होते. रोहित रडत असताना राहुल यांनी त्याच्या पाठीवरुन हात फिरवला. यावेळी त्याची पाठ थोपटलं आणि त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकारानंतर रोहित शर्मा सावरला आणि इतर खेळाडूंशी बोलू लागला.