IND vs ENG: सेमीफायनल सामन्याआधी वाईट बातमी समोर, 'हा' मॅचविनर खेळाडू जखमी!

Dawid Malan injured : सेमीफायनलच्या लढती आणखीन रंगतदार होणार आहे. अशातच सेमीफायनल सामन्याआधी (IND vs ENG Semi Final) वाईट बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता इंग्लंडला मोठा धक्का बसलाय.

Updated: Nov 7, 2022, 06:36 PM IST
IND vs ENG: सेमीफायनल सामन्याआधी वाईट बातमी समोर, 'हा' मॅचविनर खेळाडू जखमी!  title=
IND vs ENG Semi Final Dawid Malan injured

IND vs ENG Semi Final : ऑस्ट्रेलियात खेळला जात असलेल्या T20 World Cup 2022 आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. सुपर-12 च्या अंतिम सामन्यानंतर सेमीफायनलमध्ये (T20 World Cup 2022 Semi finals) प्रवेश करणाऱ्या चार संघाची नावं स्पष्ट झाली आहेत. त्यामुळे आता सेमीफायनलच्या लढती आणखीन रंगतदार होणार आहे. अशातच सेमीफायनल सामन्याआधी वाईट बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता इंग्लंडला मोठा धक्का (Dawid Malan injured) बसल्याचं पहायला मिळतंय.

सेमीफायनल सामन्यात टीम इंडियासमोर इंग्लंडसारखं मोठं आव्हान (IND vs ENG) असणार आहे. या सामन्यात इंग्लंडला हलक्यात घेण्याची चूक भारत करू शकणार नाही. आता या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलान (England batter Dawid Malan) जखमी आहे. त्यामुळे तो सेमीफायनलच्या प्लेइिंग 11 मध्ये खेळण्याची शक्यता नगन्य आहे.

डेव्हिड मलान दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनल (T20 World Cup semi-final) सामन्यात सहभागी होणार की नाही?, यावर अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. मालनने श्रीलंकेविरुद्धच्या चार विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी तो दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर त्याला मैदान सोडावं लागलं होतं. तो फलंदाजीला परत येऊ शकला नाही. इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीने (Moeen Ali) माहितीला दुजोरा दिला आहे.

आणखी वाचा - IND vs ENG T20 : टीम इंडियाचे 'तीन हुकमी एक्के' सेमीफायनलमध्ये उद्ध्वस्त करणार इंग्लंडची राजवट!

दरम्यान, डेव्हिड मलान मोठा खेळाडू आहे. सामने जिंकवण्याची त्याची ताकद आहे. मात्र, सध्या त्याला दुखापत असल्याने काही सांगता येणार नाही, असं मोईन अली म्हणाला. त्यानंतर आता टीम इंडियाला सुखद धक्का बसला आहे. इंग्लंडला नमवून टीम इंडिया फायनल (Team India in final) गाठेल, अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करत आहेत.