IND vs PAK फायनलची वाट पाहतोय 'हा' दिग्गज क्रिक्रेटर

भारतीय फॅन्सपेक्षा दिग्गज क्रिकेटरला लागली घाई, भारत-पाकिस्तान फायनल सामन्याची बघतोय वाट, कोण आहे 'हा' दिग्गज क्रिकेटर?  

Updated: Nov 7, 2022, 10:08 PM IST
IND vs PAK फायनलची वाट पाहतोय 'हा' दिग्गज क्रिक्रेटर  title=

पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. काल रविवारीच सुपर 12 चे सर्व सामने पार पडले आहेत. आता भारत, पाकिस्तान, न्युझीलंड आणि इंग्लंडमध्ये सेमी फायनलची (Semi final) लढत येत्या बुधवारपासून सुरु होणार आहे. या सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडूला भारत-पाकिस्तान (IND vs PAK) फायनल सामन्याची उत्सुकता लागली आहे. या दिग्गज खेळाडूला ही उत्सुकता का लागलीय, हे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा :  क्रिकेट विश्वातली सर्वात मोठी बातमी, प्रसिद्ध खेळाडूवर निलंबनाची कारवाई 

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन (Shane Watson) टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील अंतिम सामन्याची  वाट पाहत आहे. शेन वॉटसनच्या मते या दोन देशांमधील रोमांचक स्पर्धा पाहण्यासाठी तो उत्सुक आहे. मात्र तसे समीकरण जुळत की नाही हे पाहावे लागणार आहे.  
 

उपांत्य फेरीत धडक 

सुपर 12 मधून चार संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरले आहेत.यामध्ये भारत, पाकिस्तान, न्युझीलंड आणि इंग्लंड संघाचा समावेश आहे. गुरुवारी अॅडलेडमध्ये भारताची दुसरी उपांत्य फेरीत इंग्लंडशी लढत होईल तर एक दिवस आधी सिडनीमध्ये पाकिस्तानची लढत न्यूझीलंडशी होईल.

हे ही वाचा : भारत-पाकिस्तान महामुकाबल्यापुर्वी 'या' खेळाडूने घेतला संन्यास

क्रिकेटर काय म्हणाला?

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन (Shane Watson) म्हणाला की, 'प्रत्येकाला पाकिस्तान आणि भारताचा अंतिम सामना पाहायला आवडेल. मी दुर्दैवाने MCG मधील तो सुपर 12 सामना पाहिला नाही कारण त्याआधी मी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सामन्याची कॉमेंट्री केली होती, असे ते म्हणाले होते. 

भारत-पाक सामन्याबाबत काय म्हणालाय? 

वॉटसन (Shane Watson) पुढे म्हणाला की,'मी तो सामना पाहणाऱ्या लोकांकडून वाचलेल्या आणि ऐकलेल्या रिपोर्ट्सनुसार, हा सामना खास होता आणि टीव्हीवर पाहण्याचा आनंदच वेगळा होता. 2007 मध्ये तो T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळला होता आणि सर्वांना त्याला पुन्हा फायनलमध्ये खेळताना पाहायला आवडेल,असेही तो म्हणालाय. 

दरम्यान आता सेमी फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) पोहोचतात का, याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.