T20 World Cup: टीम इंडियात एक नाही तर सगळ्या मॅचसाठी या खेळाडूला मिळणार संधी

T20 World Cup: 4 बॉलमध्ये अख्खी मॅच फिरवणाऱ्या या खेळाडूचं स्थान मात्र निश्चित, पाहा कोण आहे 'तो'

Updated: Sep 28, 2021, 07:57 PM IST
T20 World Cup: टीम इंडियात एक नाही तर सगळ्या मॅचसाठी या खेळाडूला मिळणार संधी title=

मुंबई: IPL मध्ये सध्या कमाल करणाऱ्या धोनीच्या संघातील एका खास खेळाडूचं टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान निश्चित झालं आहे. हा खेळाडू एकच नाही तर सर्व सामने प्लेइंग इलेव्हनमध्ये असणार आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण त्याने IPL मध्ये आपल्या कामगिरीनं कमाल केली आहे. T20 World Cup सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहील आहेत. 

आयपीएल पाठोपाठ UAE मध्येच 17 ऑक्टोबरपासून टी 20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. टी -20 T20 World Cup मध्ये भारत 24 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. भारताने जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघात एकापेक्षा जास्त खेळाडूंचा समावेश आहे. अशा स्थितीत एक खेळाडू असा आहे जो टी -20 वर्ल्ड कपच्या प्रत्येक सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये भारतासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. तो खेळाडू दुसरा कोणी नाही तर स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आहे.

रवींद्र जडेजा ऑलाराऊंडर आणि फील़्डिंगसाठी टीमसाठी फायद्याचा ठरणार आहे. जडेजा सध्या त्याच्या कारकिर्दीत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. कसोटी क्रिकेटपासून टी -20 पर्यंत त्याने संघात आपलं स्थान निर्माण केलं आहे. कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात 4 सामन्यात 22 धावा मिळवून अख्खा सामना फिरवला होता. तर IPL च्या पहिल्या टप्प्यातही जडेजाचा जलवा मैदानात पाहायला मिळाला होता. 

रविवारी केकेआरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रवींद्र जडेजाने बॉलिंगपासून ते बॅटिंगपर्यत आपल्या कामगिरीनं सर्वांनाच चकीत केलं. त्याने 4 बॉलमध्ये अख्खा सामनाच फिरवला. जे किरॉन पोलार्ड आणि महेंद्रसिंग धोनीबद्दल बोलतात, त्यांनी जडेजाची खेळी पाहायला हवी. 

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात रवींद्र जडेजाने 19 व्या ओवरमध्ये सामनाच फिरवला. चेन्नईला शेवटच्या दोन ओवरमध्ये 26 धावांची गरज होती, तेव्हा कोलकाताकडून प्रसिद्ध कृष्णा  बॉलिंग करत होता. 19 व्या षटकात बॉलिंगसाठी तो आला. रवींद्र जडेजाने या ओवरमध्ये 21 धावा करत चेन्नईला विजय मिळवून दिला. पहिल्या टप्प्यातही जडेजाने एका सामन्यात चेन्नईला विजय मिळवून दिला होता.