अबुधाबी : आयपीएलच्या 14 व्या मोसमातल्या (IPL 2021) 42 व्या सामन्यात मुंबई विरुद्ध पंजाब (MI vs PBKS) आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी शेख झायेद स्टेडियममध्ये ( Sheikh Zayed Stadium) सुरुवात होणार आहे. पंजाबच्या नेतृत्वाची धुरा केएल राहुलकडे (K L Rahul) असणार आहे. तर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) मुंबईची जबाबदारी आहे. (ipl 2021 mi vs pbks ipl today match 28 september mumbai indians vs punjab kings head to head records)
दोन्ही संघांची स्थिती ही सारखीच आहे. मात्र मुंबईचा या दुसऱ्या टप्प्यातील सलग 3 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.
हेड टु हेड आकडेवारी
दोन्ही संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 27 सामन्यात आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये मुबंईने 14 सामन्यांमध्ये पंजाबवर मात केली आहे. तर पंजाबने मुंबईवर 13 सामन्याच विजय मिळवला आहे. त्यामुळे आकडेवारीवरुन दोन्ही संघ तुळ्यबल आहेत. दोन्ही संघाना प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय मिळवणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबई वरचढ ठरणार की पंजाब मात करणार, याकडे क्रिकेटप्रेमींच लक्ष असणार आहे.
मुंबई इंडियन्सचा संभावित संघ : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कायरॉन पोलार्ड (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कृणाल पंड्या, एडम मिलने, राहुल चाहर, हार्दिक पांड्या, अनमोलप्रीत सिंह, ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.
पंजाब किंग्सची संभावित प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), मयांक अगरवाल, एडन मार्करम, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, फिन एलन, ईशान पोरेल, हरप्रीत बरार, आदिल रशीद, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंह.