T20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला मोठा धक्का, प्रसिद्ध खेळाडूने दिले संघ सोडण्याचे संकेत

चांगल्या फॉर्ममध्ये असूनही टीम इंडियात संधी नाही, T20 वर्ल्ड कपपुर्वी 'या' खेळाडूने उचलंल मोठं पाऊल

Updated: Oct 8, 2022, 02:28 PM IST
 T20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला मोठा धक्का, प्रसिद्ध खेळाडूने दिले संघ सोडण्याचे संकेत  title=
मुंबई : टीम इंडिया (Team India) टी20 वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. तसेच टीम इंडियाने सरावाला देखील सुरुवात केली आहे. या टी20 वर्ल्डकपपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाच्या प्रसिद्ध खेळाडूने टी20 वर्ल्डकपपुर्वी मोठं पाऊल उचलंल आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 
 
टीम इंडियात (Team India) मोजक्याच खेळाडूंना संधी मिळते. अनेक खेळाडू देशांतर्गत अथवा आयपीएल सारख्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून सुद्धा दुर्लक्षित राहतात. असं अनेक खेळाडूंसोबत घडतं. त्यामुळे कुठेतरी या खेळाडूसोबत दुजाभाव होतो, ज्यामुळे त्यांचे खच्चीकरण होते. अशाच एका खेळाडूने सिलेक्शन कमिटीच्या या कारभाराला कंटाळून नवीन संघात जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकपपुर्वी (T20 World Cup) टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.  
 

वर्ल्ड कप सामन्याआधीच असं काय म्हणालाय पाकिस्तान, ज्यामुळे भारतीय क्रिकेट फॅन्स भडकलेत
 

पोस्टमध्ये काय?
टीम इंडियाच्या (Team India) प्रसिद्ध खेळाडूने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्याने मोठी घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये तो, नवीन संघासोबत करारबद्ध झाल्याची माहिती देतोय. मात्र त्याने या पोस्टमध्ये कोणत्या संघाकडून व कोणत्या देशाकडून खेळणार आहे, याची माहिती दिली नाही आहे.याउलट त्याने क्रिकेट फॅन्सना संघाचे नाव ओळखण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच त्याने येत्या 10 ऑक्टोंबरला याबाबतची घोषणा करणार असल्याची माहिती दिली आहे. 
 
कोण आहे हा खेळाडू? 
हा खेळाडू टीम इंडियाचा (Team India) 34 वर्षीय अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आहे. पुजारा टीम इंडियातून फक्त टेस्ट फॉरमॅटमध्ये खेळतो. तसेच तो देशांतर्गत व विदेशातील अनेक स्पर्धा खेळतो. पुजारा नुकताच ससेक्सकडून लिस्ट ए क्रिकेट खेळला. रॉयल लंडन वन डे चषकात त्याने चांगली कामगिरी केली आणि यादरम्यान त्याने शतकी खेळीही केली. संध्या तो चांगलाच फॉर्ममध्ये आहे. 
 
18 हजाराहून अधिक धावा
पुजाराच्या (Cheteshwar Pujara) नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 18 हजार 123 धावा आहेत. त्याने भारतीय संघासाठी 101 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत ज्यात 96 कसोटी सामन्यांचा समावेश आहे. पुजाराने केवळ 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने 10.20 च्या सरासरीने 51 धावा केल्या आहेत. त्याच्या कसोटी फॉरमॅटमध्ये 6 हजार 782 धावा आहेत. 
 
दरम्यान आता चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) कोणत्या नवीन संघाकडून खेळतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यासोबतच तो  येत्या 10 ऑक्टोबरला याबाबतची घोषणा करणार आहे. या घोषणेची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता आहे.