आताच्या संघात युवराजच्या तोडीचे दोन खेळाडू, सिक्सर किंगचा विक्रम मोडणार का?

T20 विश्वचषकात 'या' 5 भारतीयांनी मारलेत सर्वाधिक षटकार, पाहा कोण आहेत!

Updated: Oct 13, 2022, 12:09 AM IST
आताच्या संघात युवराजच्या तोडीचे दोन खेळाडू, सिक्सर किंगचा विक्रम मोडणार का? title=

T20 World Cup 2022 : टी-20 वर्ल्ड कप काही दिवसांवर आला असून क्रीडाप्रेमी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपचं यजमानपद हे ऑस्ट्रेलिया आहे. टी- 20 म्हणजे कमी निर्धारित 20 षटकांचा खेळ त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोलंदाजांची धुलाई झालेली पाहायला मिळते. याच्याआधी टी-20 वर्ल्ड कप झाले त्यामध्ये आपल्या गगनचुंबी षटकारांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे फलंदाज तुम्हाला माहिती आहेत का?, ज्यांनी सर्वाधिक षटकार खेचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे सर्वात जास्त 5 षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये आताच्या संघामधील दोन खेळाडूंचा समावेश आहे. (T20 world cup 2022 most sixes by indian players in t20 world cup Sports Marathi news)

आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीमध्ये सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेला माजी खेळाडू युवराज सिंहने 33 षटकार मारले आहेत. यामध्ये सर्वांच्या आठवणीतील म्हणजे इंग्लंडच्या स्टुअर्ड ब्रॉडला मारलेले सलग 6 सिक्स, एका ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स युवराजने 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपवेळी मारले होते. 

या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने T20 विश्वचषकातील 33 सामन्यांमध्ये 31 षटकार ठोकले आहेत. 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असल्याने रोहित युवराज सिंगचा 33 षटकारांचा विक्रम मोडू शकतो. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने T20 विश्वचषकात 21 सामने खेळताना 20 षटकार ठोकले आहेत.

सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक एम.एस. धोनीने टी-20 विश्वचषकातील 33 सामन्यांमध्ये 16 षटकारही मारले आहेत. टी-20 विश्वचषकातील भारतासाठी पहिलं शतक झळकावणाऱ्या सुरेश रैनाचाही समावेश आहे. सुरेश रैनाने T20 विश्वचषकातील 26 सामन्यांमध्ये 12 षटकार मारले आहेत.

दरम्यान, या  टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्व क्रिकेट प्रेमीचं लक्ष आहे. पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध असणार आहे. मात्र भारतीय संघातील दोन खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत.