उमरान मलिकच्या बहिणीचे फोटो पाहिलेत का? सौंदर्याच्याबाबतीत अभिनेत्रीनांही देते टक्कर

उमरान मलिकला कुटुंबियांची साथ, बहिणींनी दिलं क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन  

Updated: Oct 12, 2022, 08:38 PM IST
उमरान मलिकच्या बहिणीचे फोटो पाहिलेत का? सौंदर्याच्याबाबतीत अभिनेत्रीनांही देते टक्कर title=

Cricekt News :  आयपीएल 2022 (IPL 2022) नंतर बातम्यांमध्ये एक नाव जास्त चर्चेत आलं. ते नाव होतं उमरान मलिक. भारताचा युवा फास्ट बॉलर उमरान मलिक (Umran Malik) चांगलाच चर्चेत आला. उमरानचा वेग पाहून जगातील अनेक क्रिकेट चाहते त्याचे फॅन झाले. जम्मू काश्मीरचा (Jammu Kashmir) हा युवा गोलंदाज भविष्यात भारताचा स्टार खेळाडू ठरु शकतो. युवा गोलंदाज उमरान (Umran Malik) सध्या त्याच्या बॉलिंगमुळे चर्चेत आलाय. उमरानचा वेग 150Kmph च्या वर आहे. त्याच्या वेगवान बॉलिंगमुळे अल्पावधतीच त्याचे लाखो चाहते झालेत. आता अर्थातच त्याच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. 

उमरान मलिकचं कुटुंब
उमरान मलिकचा जन्म 22 नोव्हेंबर 1999 ला जम्मू काश्मिरमधल्या श्रीनगर इथं झाला. त्याच्या वडिलांचं नाव अब्दुल रशीद असं असून ते फळ विक्रेता आहेत. उमरानला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्याने क्रिकेटला आपलं करियर बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या कुटुंबियांनाही त्याला चांगला पाठिंबा दिला.

त्याच्या यशात त्याच्या बहिणींनींचाही मोठा वाटा आहे. उमरानला दोन बहिणी आहेत. त्यातल्या एका बहिणीचं नाव शहनाज मलिक आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यातल्या एका फोटोत उमरान आपले आई-वडिल आणि दोन बहिणींबरोबर दिसत आहे. या फोटोला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळतेय.

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी
आयपीएल 2021 मध्ये उमरानने पदार्पण केलं. पण आयपीएल 2022 च्या हंगामात तो खऱ्या अर्थाने जगासमोर आला.  जम्मू-काश्मीरच्या या गोलंदाजाने आपल्या वेगानं अनुभवी फलंदाजांना हैराण केलं. उमरानने IPL 2022 मध्ये 11 सामन्यांत 24.26 च्या सरासरीने पंधरा बळी घेतले  25 धावांत पाच बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

वडील आजही करतात फळ विक्री
उमरान मलिक (Umran Malik) चे वडील आज ही फळ विक्रीचा व्यवसाय करतात. उमरानचे वडील अब्दुल रशीद यांनी म्हटलं की, 'मुलाची कामगिरी पाहून मार्केटमधले लोकं आता त्यांना अधिक सन्मान देत आहेत. मुलाला देशासाठी वर्ल्डकपमध्ये खेळताना पाहायचं आहे. त्याला लहानपणापासूनच एक घातल बॉलर बनण्याची इच्छा होती.'

आयपीएलमध्ये विक्रमाची नोंद
आयपीएलमध्ये त्याने 157 किमी प्रती तास या वेगाने बॉल टाकला होता. इतकंच नाही तर आयपीएलमध्ये दोन वेळा त्याने 151 किमी प्रतितास वेगाने बॉल टाकण्याची किमया साधलीय.