मौका मौका! India Vs Pakistan पुन्हा सामना, या मॅचवर ठरणार T20 वर्ल्डकपचं भविष्य

आशिया कप 2022 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत पाकिस्तान संघानं भारताचा पराभव करत अंतिम फेरीचा मार्ग रोखला होता. 

Updated: Sep 11, 2022, 07:58 PM IST
मौका मौका! India Vs Pakistan पुन्हा सामना, या मॅचवर ठरणार T20 वर्ल्डकपचं भविष्य title=
Photo- Twitter

India Vs Pakistan T20 World Cup: आशिया कप 2022 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत पाकिस्तान संघानं भारताचा पराभव करत अंतिम फेरीचा मार्ग रोखला होता. मागच्या वर्षीच्या टी 20 वर्ल्डकपमध्येही पाकिस्ताननं भारताचा पराभव करून बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. टी 20 वर्ल्डकप 2022 च्या सुपर 12 फेरीत भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत (India Vs Pakistan) होणार आहे. या सामन्यानंतर वर्ल्डकपमधील वाटचाल सुरु होणार आहे. सुपर 12 फेरीतून चार संघ उपांत्य फेरीत पोहोचणार आहेत. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे.  

सुपर 12 फेरीत भारतीय संघाच्या गटात बांगलादेश, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका हे संघ आहेत. तर ग्रुप स्टेजमधून श्रीलंका, नामिबिया, यूएई, नेदरलँड, वेस्ट इंडिज, स्कॉटलँड, झिम्बाब्वे, आयर्लंड या आठ संघापैकी चार संघाची सुपर 12 फेरीत निवड होणार आहे. त्यापैकी दोन  संघ भारतीय गटात समाविष्ट होईल. सुपर 12 फेरीत भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. 

  • भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर 2022, दुपारी 1.30 वाजता
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेज, 27 ऑक्टोबर 2022, दुपारी 12.30 वाजता
  • भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका, 30 ऑक्टोबर, दुपारी 4.30 वाजता
  • भारत विरुद्ध बांगलादेश, 2 नोव्हेंबर, दुपारी 1.30 वाजता
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेज, 6 नोव्हेंबर, दुपारी 1.30 वाजता