T20 World Cup 2021: भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये विराट का ठरतो गेम चेंजिंग फॅक्टर

पाकिस्तानच्या खेळाडूंना विराट हे नाव घेतलं तरी धडकी भरते...कॅप्टन भारताचा.. पण पाकिस्तानात त्याची का आहे जबरजदस्त क्रेझ 

Updated: Oct 24, 2021, 06:01 PM IST
T20 World Cup 2021: भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये विराट का ठरतो गेम चेंजिंग फॅक्टर title=

मुंबई: टी -20 वर्ल्डकपमधील सर्वात हाय व्होल्टेज सामना आज होणार आहे. भारत-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने येत आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूंना विराट हे नाव घेतलं तरी धडकी भरते. असं काय आहे स्पेशल विराटमध्ये इंडिया पाकिस्तान मॅचमध्ये विराट का ठरतो गेम चेंजिंग फॅक्टर जाणून घेऊया. 

जोपर्यंत विराट पीचवर आहे तोपर्यंत टीम इंडिया जिंकण्याची आशा कायम असते. सर्वाधिक भीती जर विराटची कोणाला वाटत असेल तर ते म्हणजे पाकिस्तानला, कारण पाकिस्तानविरोधात विराटची कामगिरी नेहमीच जबरदस्त राहिली आहे. 

विराटनं पाकिस्तानविरोधात सहा टी 20 इंटरनॅशनल मॅचेस खेळल्यात आहेत. 6 मॅचेसमध्ये 85 रन्सच्या सरासरीनं 254 रन्स केले आहेत.  पाकिस्तानविरोधात सहा मॅचेसपैकी दोन मॅचमध्ये हाफ सेंच्युरी विराटच्या नावावर आहे. विराटचा पाकिस्तानविरोधातला स्ट्राईक रेट 118.19 आहे. गेल्या वर्ल्डकप टी 20 मध्ये पाकिस्तान विरोधात विराटमुळेच टीम इंडिया जिंकली होती.

कोहलीनं 2016 च्या T20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरोधात 27 बॉल्समध्ये 55 धावांची खेळी केली आणि पाकिस्तानला सळो की पळो करुन सोडलं होतं. आता पुन्हा पाकिस्तानविरोधातल्या मॅचमध्ये विराटची बॅट अशीच सपासप चालेल, अशी आशा आहे. विराटला रोखणं हेच पाकिस्तानपुढचं मोठं आव्हान असेल. सध्याच्या टीममध्ये टी 20 मध्ये सर्वाधिक रन्सचा विक्रम विराटच्याच नावावर आहे. विराटनं 16 मॅचेसमध्ये 9 हाफसेंच्युरी करत तब्बल 777 रन्स केले आहेत. 

कॅप्टन म्हणून विराटचा हा शेवटचा टी २० वर्ल्डकप आहे. कारण टी 20 वर्ल्ड कपआधी त्याने आपण यानंतर कॅप्टनशीप सोडणार असल्याचं ट्वीट करून सांगितलं होतं. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला चीतपट करण्याची संधी विराट मुळीच सोडणार नाही हे निश्चित आहे. या सामन्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. कर्णधार म्हणून विराटचा हा अखेरचा वर्ल्ड कप असल्याने टीम इंडिया देखील हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे.