T20 World Cup 2022 India vs South Africa: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मानं गचाळ क्षेत्ररक्षणावर खापर फोडलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. भारतानं 20 षटकात 9 गडी गमवून 133 धावा केल्या आणि विजयासाठी 134 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेनं 19.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. भारताच्या पराभवामुळे उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं आहे. गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका संघ अव्वल स्थानी आहे. तर भारताचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तर बांगलादेश संघाची धावगती कमी असल्याने तिसऱ्या स्थानी आहे. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
"पर्थची खेळपट्टी पाहता सीमर्सला मदत होईल हे आम्हाला माहीत होतं. म्हणूनच 130 धावांचा पाठलाग सोपा नव्हता. मला वाटले की आम्ही शेवटपर्यंत चांगली लढत दिली पण दक्षिण आफ्रिकेने शेवटपर्यंत चांगला खेळ केला. वेगवान गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी चांगली होती त्यांना विकेट घेता आले असते. मिलर आणि मार्करमची मॅच-विनिंग भागीदारी रंगली. आम्ही मैदानावर फारसे चांगले नव्हतो. आम्ही संधीचं सोनं करू शकलोनाही, आम्ही माझ्यासह काही रनआउटच्या संधी गमावल्या", असं रोहित शर्मानं सांगितलं.
"शेवटच्या षटकात फिरकीपटूंसोबत काय होतं हे मी पाहिले आहे. त्यामुळे मला अश्विनची षटकं संपवायची होती. नवीन फलंदाज आल्याने अश्विनसाठी गोलंदाजी करण्याची ही योग्य वेळ होती.", असंही रोहित शर्मानं पुढे सांगितलं.
भारत- केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, दिनश कार्तिक, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
दक्षिण आफ्रिका- क्विंटन डिकॉक, टेम्बा, रिली रॉस्सो, एडन मारक्रम, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्ब्स, वायन पारनेल, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिच नोर्तजे, लुंगी एनगिडी