ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये Suryakumar Yadav ला मिळणार संधी?

नुकतंच दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये पुढच्या वर्षी येणारा वर्ल्डकप आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Updated: Dec 26, 2022, 06:34 PM IST
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये Suryakumar Yadav ला मिळणार संधी? title=

Suryakumar Yadav in Test : केवळ टी-20 फॉर्मेट नाही तर रणजी ट्रॉफीमध्येही सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) त्याच्या उत्तम फलंदाजीने आपलं नाणं खणखणीत वाजवलं. नुकतंच सुर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमध्ये (T-20 cricket) नंबर 1 फलंदाज बनला. मुख्य म्हणजे त्याच्यासाठी हे कोणा स्वप्नापेक्षा कमी नव्हतं, असं सूर्याने म्हटलंय. नुकतंच दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये पुढच्या वर्षी येणारा वर्ल्डकप आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

नंबर-1 फलंदाज बनणं एका स्वप्नाप्रमाणे

सूर्यकुमारला ज्यावेळी इंटरव्यूमध्ये विचारण्यात आलं की, जर तुला यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला सांगितलं असतं की, तू 2022 च्या अखेरीस तू नंबर 1 फलंदाज बनशील, तर त्यावर तुझा विश्वास बसला असता का? याला उत्तर देताना सूर्या म्हणाला की, हे मला स्वप्नाप्रमाणे वाटतं. वर्षाच्या सुरुवातीला जर कोणी मला सांगितलं असतं की, मी नंबर 1 फलंदाज बनणार आहे, तर मला माहिती नाही मी कशी प्रतिक्रिया दिली असती.  

टेस्ट टीममध्ये संधी मिळेल अशी आशा

या इंटरव्यूमध्ये सूर्याला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या 4 टेस्ट सामन्यांच्या सिरीजसाठी टीममध्ये त्याला जागा मिळू शकते का, अशा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सूर्यकुमार म्हणाला, "मी रेड बॉलच्या फॉर्मेटमध्ये राष्ट्रीय पातळीवर खेळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर त्यामध्येच आहे. टेस्ट सामन्यामध्ये तुम्हाला पाच दिवसांक अवघड तसंच रोमांचक परिस्थितीचा सामना करावा लागतो. या आव्हानाचा सामना करायचाय, त्यामुळे संधी मिळाल्यास मी तयार आहे."

रणजी ट्रॉफीमध्येही सूर्याचा जलवा कायम

मुंबई आणि हैदराबाद (Mumbai vs Hyderabad) यांच्यामध्ये रणजीचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात देखील सूर्यकुमार यादवने त्याच्या तुफान फलंदाजीचा नजराणा दाखवला. जवळपास 3 वर्षांनंतर सुर्यकुमारने रेड बॉल क्रिकेटमध्ये कमबॅक केलं, आणि धडाकेबाद फलंदाजी सर्वाचं मन जिंकलं.

सूर्यकुमारने 80 बॉलमध्ये 90 रन्सची खेळी केली. यामध्ये त्याने 15 फोर आणि 1 सिक्स देखील लगावला आहे. सूर्याने जवळपास 113 च्या स्ट्राईक रेटने रन केलेत. मात्र यावेळी तो शतक पूर्ण करू शकला नाही. 90 रन्सवर तो LBW आऊट झाला. त्यामुळे चाहते काहीसे नाराज झाले आहेत.