India vs Sri Lanka 2nd t20 Pune : नववर्षाच्या सुरूवातीला भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 मालिका (India vs SriLanka t-20 Series) होणार आहे. या मालिकेमधील दुसरा सामना पुण्यामध्ये (Pune) खेळवण्यात येणार आहे. पुण्यामध्ये तब्बल 22 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. गहुंजेमधील (Gahunje) महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममध्ये सामना खेळवला जाणार आहे. जवळपास दोन वर्षांनी सामना होणार असल्याने पुणेकरही हा सामना पाहण्यासाठी उत्सुक असतील. (Ind vs SL T20 Schedule India vs Sri Lanka 2nd t20 on 5th Jan in Pune Cricket News Marathi)
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी पेटीएम इनसायडरवर तिकीटांची विक्री सुरु करण्यात आली आहे. कोविड संदर्भात कुठली ही सूचना आली नाही, त्यामुळे संपूर्ण स्टेडियम मधील तिकीट उपलब्ध असणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंकेमधील तीन सामन्यांची मालिका होणार असून तिन्ही सामने पहिला सामना मुंबई, दुसरा पुणे तर तिसरा सामना राजकोट येथे होणार आहे. पुण्यामध्ये दुसरा सामना 5 जानेवारीला होणार आहे.
दुखापतीच्या कारणामुळे टीमचा नियमित कर्णधार रोहित शर्माला श्रीलंकेविरूद्धची (Rohit Sharma) टी-20 सिरीज खेळणार नाहीये. बांगलादेशाविरूद्ध झालेल्या वनडे सिरीजच्या दुसऱ्या सामन्यात रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे कसोटी मालिकेमध्येही तो खेळताना दिसला नाही. क्रीडा वर्तुळात अशी चर्चा आहे की, न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडिया असताना हार्दिक पांड्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे आता श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेमध्ये संघाची धुराकोणाकडे दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.