अखेरच्या सामन्याआधी कॅप्टन Sunil Chhetri भावूक, म्हणतो 'ड्रेसिंग रुममध्ये आम्ही...'

India vs Kuwait World Cup Football : भारतीय फुटबॉल संघाचा कॅप्टन सुनील छेत्री आज अखेरचा सामना खेळणार आहे. त्याआधी सुनील छेत्रीने मोठं वक्तव्य केलं.

सौरभ तळेकर | Updated: Jun 6, 2024, 07:10 PM IST
अखेरच्या सामन्याआधी कॅप्टन Sunil Chhetri भावूक, म्हणतो 'ड्रेसिंग रुममध्ये आम्ही...'  title=
Sunil Chhetri Emotional before Last International Match India vs Kuwait

India vs Kuwait FIFA WC Qualifier, Sunil Chhetri Retirement: भारतीय फुटबॉलला सोन्याचे दिवस दाखवणारा भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री (Suni Chhetri) याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा घेतली आहे. आज सुनील छेत्री अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळेल. विश्वकरंडक फुटबॉल पात्रता स्पर्धेत कुवेतविरुद्ध (India vs Kuwait) सुनील छेत्री अंतिम सामना असणार आहे. भारतीय फुटबॉल संघासाठी हा एक ऐतिहासिक सामना असेल. त्यामुळे आता देशभरातील अनेक चाहते भावूक झाल्याचं पहायला मिळतंय. अखेरच्या सामन्याआधी सुनील छेत्रीने पूर्वसंध्येला मोठं वक्तव्य केलं अन् भावना व्यक्त केल्या.

कुवेतविरुद्ध भारताचा तिसऱ्या फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित होणार आहे. अशातच सुनील छेत्रीचा अखेरचा सामना असल्याने भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये भावूक वातावरण पहायला मिळतंय. आम्ही सर्व खेळाडू 20 दिवसांपासून एकत्र आहोत. माझा हा अखेरचा सामना आहे याची प्रत्येकाला जाणीव आहे. त्यामुळे प्रत्येकाची मानसिक तयारी देखील झालीये. संघाला कसा विजय मिळवला जाईल? यावर आम्ही काम करत आहोत. आम्हाला पूर्णपणे संघाच्या कामगिरीवर पूर्ण फोकस करायचाय, त्यामुळे मला निवृत्तीबद्दल विचारू नका, असंही सुनील छेत्रीने यावेळी म्हटलंय.

निवृत्तीबद्दल आम्ही ड्रेसिंग रुममध्ये काहीही बोललो नाहीय. आम्ही नेहमीप्रमाणे मस्ती करतोय, आम्ही माझ्या निवृत्तीकडे भावनिक नजरेने पाहत नाही. देशाला विजय मिळवून देणं हेच आमचं लक्ष आहे, असंही सुनील छेत्रीने म्हटलंय. भारत आणि कुवेत यांच्यातील हा सामना 6 जून रोजी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

दरम्यान, सुनील छेत्रीने भारतासाठी तब्बल 150 सामने खेळले असून त्याने 94 गोल केले आहेत. सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यानंतर सुनील छेत्री तिसऱ्या स्थानी आहे. सुनील छेत्रीने निवृत्ती घेतल्यानंतर आता भारतीय फुटबॉलमध्ये मोठी पोकळी निर्माण झालीये.