ICC World Cup 2023: वर्ल्ड कपमधून बाहेर पडला हा स्टार क्रिकेटर; पाहा कोणाला मिळाली संधी?

ICC World Cup Qualifiers: एकंदरीत दीड महिने चालणाऱ्या या वर्ल्ड कपविषयी उत्कंठा आणखीच वाढल्याचं दिसून येतंय. अशातच आता स्टार प्लेयर वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्याचं समोर आलंय.

Updated: Jun 30, 2023, 01:17 PM IST
ICC World Cup 2023: वर्ल्ड कपमधून बाहेर पडला हा स्टार क्रिकेटर; पाहा कोणाला मिळाली संधी?  title=
Dushmantha Chameera Ruled Out of ODI World Cup 2023

ICC ODI World Cup 2023: सर्वांना प्रतिक्षा असलेल्या आगामी वनडे वर्ल्ड कपला (ODI World Cup 2023) येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. तर अंतिम म्हणजेच फायनलचा सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. त्यामुळे एकंदरीत दीड महिने चालणाऱ्या या वर्ल्ड कपविषयी उत्कंठा आणखीच वाढल्याचं दिसून येतंय. या वर्ल्ड कपमध्ये 10 संघ भाग घेणार आहेत. त्यातील 8 संघांनी आधीच क्वालिफाय केलंय. तर 6 संघ पात्रता फेरीत झुंज देत असल्याचं पहायला मिळतंय. 6 पैकी 2 संघ क्वालिफायर करतील. नेपाळ, यूएस, आयर्लंड आणि यूएई वर्ल्ड कपच्या मुख्य फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीतून बाहेर आहेत. अशातच आता स्टार प्लेयर वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्याचं समोर आलंय.

शुक्रवारी श्रीलंकेचा पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध सुपर 6 मध्ये होणार आहे. त्यापूर्वीच स्टार गोलंदाज दुष्मंथा चमिराच्या (Dushmantha Chameera) रूपाने मोठा धक्का बसला आहे. चमिरा पात्रता फेरीतून बाहेर पडला होता. त्यानंतर आता तो वर्ल्ड कपच्या मुख्य स्पर्धेतून देखील बाहेर पडल्याचं दिसतंय. श्रीलंका क्रिकेटने ट्विट करत चिंता व्यक्त केली आहे. श्रीलंकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी सराव करताना उजव्या खांद्याला झालेल्या उजव्या पेक्टोरल स्नायूच्या दुखापतीतून सावरत आहे, असं श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे.

सुपर सिक्स फेरीच्या सामन्यांच्या गोलंदाजीसाठी उपलब्ध होणार नाही. अनुभवी चमीरा खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त झाला होता, मात्र तो वेळेत बरा होऊ शकला नाही, अशी माहिती क्रिकेट बोर्डाने दिलीये. चमीराच्या जागी दिलशान मदुशंकाचा संघात समावेश करण्यात आल्याचं देखील श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितलंय.

आणखी वाचा - ICC World Cup: वर्ल्ड कप सेमीफायनलबद्दल ख्रिस गेलची मोठी भविष्यवाणी; युनिव्हर्सल बॉस म्हणतो...

दरम्यान, दिलशान मदुशंका हा डावखुरा गोलंदाज आहे जो संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. मदुशंका केवळ दोन एकदिवसीय सामने खेळला आहे. त्यामुळे तो आगामी काळात कसा खेळ दाखवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

कसा असेल श्रीलंकेचा संघ?

दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उप-कर्णधार, विकेटकीपर), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, चरित अस्लंका, धनंजय डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा (विकेटकीपर), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, कसून राजिता, महेश कुमार, महेश कुमार, कुमारी. मथिसा पाथीराना, दुषण हेमंता, दिलशान मधुशंका.