India vs Sri Lanka | टीम इंडिया विरुद्धच्या वनडे आणि T20I सीरिजसाठी श्रीलंकन टीमची घोषणा

येत्या 18 जुलैपासून एकदिवसीय (Sri Lanka vs India) मालिकेला सुरुवात होणार आहे. 

Updated: Jul 16, 2021, 05:42 PM IST
India vs Sri Lanka | टीम इंडिया विरुद्धच्या वनडे आणि T20I सीरिजसाठी श्रीलंकन टीमची घोषणा title=

कोलंबो : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात वनडे आणि टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. या वनडे आणि टी 20 मालिकांसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने श्रीलंका संघाची घोषणा केली आहे. ट्विटद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. बोर्डाने एकूण 24 सदस्यीय खेळाडूंची निवड केली आहे. (Sri Lanka announced squad for ODI and t20i series against team India)

दासुन शनाकाकडे नेतृत्व

या वनडे सीरिजआधी श्रीलंकेला मोठा धक्का बसला. नियमित कर्णधार कुसल परेराला (Kusal Perera) दुखापतीमुळे 2 मालिकांना मुकावे लागले. त्यामुळे निवड समितीने अष्टपैलू खेळाडू दासून शनाकाला (Dasun Shanaka) नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे या मालिकेत दासून श्रीलंकेची कॅप्टन्सी सांभाळणार आहे. 

वनडे आणि टी 20 सीरिजसाठी श्रीलंका

दासुन शनाका (कॅप्टन) धनंजय डी सिल्वा,  अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पाथुम निसानका, चरिथ असलांका, वनिंदू हसरंगा, आशेन बांदारा, मिनोद भानुका,लाहिरू उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, बिनुरा फर्नांडो, दुश्मंथ चमेरा, लक्षन संडकन, अकिला धनंजया, शिरण फर्नांडो, धनंजय लक्षन, ईशान जयरात्नेप्रवीण जयविक्रेमा, असिता फर्नांडो, कसुन राजीता, लाहिरू कुमारा आणि ईसूरु उदाना. 

टीम इंडिया

शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया. 

वनडे आणि टी 20 सीरिजचे वेळापत्रक

18, 20 आणि 23 जुलैला अनुक्रमे 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. तर यानंतर टी 20 मालिकेतील 3 सामने हे  25, 27 आणि 29 जुलैला पार पडणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व सामने एकाच मैदानात खेळवण्यात येणार आहेत. त्यानुसार या सामन्यांचे आयोजन हे आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आले आहे.