द. आफ्रिकेचा ९६ धावांनी दमदार विजय

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिका संघाने विजयी सुरुवात केली. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेने ९६ धावांनी दमदार विजय मिळवलाय.

Updated: Jun 3, 2017, 11:01 PM IST
द. आफ्रिकेचा ९६ धावांनी दमदार विजय title=

ओव्हल : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिका संघाने विजयी सुरुवात केली. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेने ९६ धावांनी दमदार विजय मिळवलाय.

द. आफ्रिकेने श्रीलंकेसमोर विजयासाठी ३०० धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा संपूर्ण संघ २०३ धावांत गारद झाला. 

आफ्रिकेच्या इम्रान ताहीरने सर्वाधिक ४ विकेट घेतल श्रीलंकेचा गाशा गुंडाळला. त्याने २७ धावांत ४ बळी मिळवले. 

श्रीलंकेकडून उपुल थरंगाने ५७ धावा केल्या तर सलामीवीर निरोशन डिकवेलाने ४१ धावांची खेळी केली. कुसल पेरेरा ४४ धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, श्रीलंकेने टॉस जिंकत दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. द. आफ्रिकेने ५० षटकांत ६ गडी गमावत २९९ धावा केल्यात. आफ्रिकेच्या हाशिम आमलाने शानदार १०३ धावांची खेळी केली. तर फाफ डू प्लेसिसने ७५ धावांची जबरदस्त खेळी केली. जे पी ड्युमिनी ३८ धावांवर नाबाद राहिला.