लंडन : गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळे यांच्यात आलबेल नसल्याच्या चर्चेबाबत विराट कोहलीने विधान केलंय. सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने या वादाबाबत स्पष्टीकरण दिलंय.
माझ्यात आणि अनिल कुंबळे यांच्यात कोणताही वाद नाहीये. कोणत्याही अफवा पसरवू नयेत. माझ्याबाबतीत खूप साऱ्या गोष्टी लिहिल्या जातायत. मात्र मला कळत नाहीये की लोक असं का करतायत, अस विराट म्हणाला.
गेल्या एका वर्षापासून कोच अनिल कुंबळेंसह खेळण्याच्या अनुभवाबद्दलही कोहलीने यावेळी सांगितले. कुंबळेसोबतच्या वादावर बोलताना विराट म्हणाला, मला ज्याचे ज्ञान नसते त्याबाबत मी कोणतेही विधान करत नाही. आपल्या इथे लोक स्वत:ची चूक मान्य करत नाही. जर मी चुकलोत तर मी ते स्वीकारतो. दरवेळी तुम्हाला एखादी गोष्ट मान्य असतेच असं नाही. ही माणसाची वृत्ती आहे, असे विराटने सांगितले.
उद्या होणाऱ्या सामन्याबाबत विराट म्हणाला, आम्ही आमचा नैसर्गिक खेळ करु. कोणाविरुद्ध खेळतोय याने आम्हाला काही फरक पडत नाही. साधा सामना असो वा मोठ्या स्पर्धेतील सामना. सगळे सामने एकसमानव आहेत कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो.