टीम इंडियाचा पराभव, २-०ने मालिकाही गमावली

टीम इंडियाचा विजयी रथ दक्षिण आफ्रिकेने रोखला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला चांगली कमगिरी करता आलेली नाही.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 17, 2018, 04:51 PM IST
टीम इंडियाचा पराभव, २-०ने मालिकाही गमावली title=

सेंच्युरियन : टीम इंडियाचा विजयी रथ दक्षिण आफ्रिकेने रोखला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला चांगली कमगिरी करता आलेली नाही. त्यामुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी २-० ने कसोटी मालिकाही गमावली. 

दक्षिण आफ्रिकेने २-० ने आघाडी घेतली

टीम इंडियाने पहिल्या कसोटीप्रमाणे दुसऱ्या कसोटी सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने भारतावर १३५ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या २८७ धावांचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव १५१ धावांवर गडगडला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने २-० ने आघाडी घेतली आहे. 

India vs South Africa: Virat Kohli gets angry at Lungi Ngidi after send-off at Centurion

टीम इंडिया निम्मा संघ तंबूत

दुसऱ्या डावात टीम इंडियाकडून रोहित शर्माने सर्वाधिक ४७ धावा केल्या. चेतेश्वर पूजारा १९ धावांवर धावबाद झाला तर पार्थिव पटेलला १९ धावांवर रबाडाने मॉर्केलकरवी झेलबाद केले. ६५ धावांत टीम इंडिया निम्मा संघ तंबूत परतला. कसोटीवर दक्षिण आफ्रिकेने आपली पकड मिळवत टीम इंडियाला विजयासाठी २८७ धावांचे टार्गेट दिले. मात्र, टीम इंडियाच्या खेळाडूंना ते झेपले नाही. 

दक्षिण आफ्रिकेकडून चांगली गोलंदाजी  

दक्षिण आफ्रिकेकडून एन्गिडीने चांगली गोलंदाजी केली. त्याने सहा विकेट घेतल्या. रबाडाने तीन गडी बाद करुन त्याला साथ दिली. दरम्यान,  कालच्या ३ बाद ३५ वरुन आज सकाळी डाव पुढे सुरु झाल्यानंतर टीम इंडियाला चेतेश्वर पूजार आणि पार्थिव पटेलच्या रुपाने आणखी दोन धक्के बसले. त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले.