मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून विराट कोहलीच्या बॅटमधून धावा निघताना दिसत नाही. कोहलीचा फ्लॉप शो कायम आहे. कोहलीनं तिन्ही फॉरमॅटचं कर्णधारपद सोडल्यानंतर फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतरही कोहलीला फार यश आलं नाही.
विराट कोहलीची सध्या स्थिती अत्यंत वाईट आहे. त्याचा फ्लॉप शो पाहता अनेकांनी कोहलीला ब्रेक देण्याची मागणी लावून धरली आहे. तर रवी शास्त्रींनी कोहलीला आयपीएल सोडून आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
आता कोहलीच्या वाईट फॉर्मवर आणि त्याच्या ब्रेक घेण्याबाबत चर्चा सुरू असतानाच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
''रोहित आणि विराट सध्या अत्यंत वाईट फॉर्ममधून जात आहेत. याबद्दल गांगुली यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की दोन्ही खेळाडू खूप महान आहेत. सध्या त्यांचा फॉर्म वाईट आहे. पण लवकरच ते त्यांच्या चांगल्या फॉर्ममध्ये परततील आणि मोठी धावसंख्या उभारतील.
विराट कोहलीच्या मनात काय चालले आहे ते मला कळत नाही? पण, एक गोष्ट नक्की की तो लवकरच फॉर्ममध्ये येईल आणि त्याच्या बॅटने धावा निघतील असा विश्वास सौरव गांगुली यांनी व्यक्त केला आहे.''